कुत्र्यांच्या हल्ल्यात बिबट्या जखमी

By Admin | Updated: April 4, 2017 16:09 IST2017-04-04T16:09:30+5:302017-04-04T16:09:30+5:30

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे शेळीवर हल्ला करणाऱ्या बिबट्यावरच सात कुत्र्यांनी जोरदार हल्ला चढवित त्यास जखमी केले.

Dogs injured in dogs attack | कुत्र्यांच्या हल्ल्यात बिबट्या जखमी

कुत्र्यांच्या हल्ल्यात बिबट्या जखमी

आॅनलाईन लोकमत
देवळाली प्रवरा (अहमदनगर), दि़ ४ - राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे शेळीवर हल्ला करणाऱ्या बिबट्यावरच सात कुत्र्यांनी जोरदार हल्ला चढवित त्यास जखमी केले. जखमी बिबट्याला जेरबंद करून उपचार करण्याची कामगिरी वन खात्याला करावी लागली़
बाळासाहेब गाढे यांच्या वस्तीवर शेळीवर केलेला हल्ला बिबट्याच्या अंगलट आला़ बिबट्याने शेळीवर हल्ला केल्याचे लक्षात येताच कुत्र्यांनी एक जूट दाखवित त्याला घेरले़ शेळीवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली़ कुत्र्याच्या हल्ल्यात बिबट्या जखमी झाला़
वन क्षेत्रपाल यु़बी़वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल जी़एऩलोंढे, डी़एस़मेहेत्रे, एम़एम़मोरे, प्रदीप कोहकडे, लक्ष्मण किनकर, बी़पी़आडसुरे, यु़पीख़राडे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली़ तातडीने राहुरी येथून पिंजरा आणून त्यात बिबट्याला जेरबंद करण्यात आले़ बिबट्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले़ उपचारानंतर बिबट्याला डिग्रस येथील रोपवाटिकेत हलविण्यात आले़ बिबट्याचा काही दिवस मुक्काम डिग्रस येथे राहणार आहे़
लपण्याची ठिकाणे कमी झाल्याने बिबट्याची भटकंती वाढली आहे़ भक्ष्य मिळविण्यासाठी बिबट्याची भटकंती सुरू आहे़ राहुरी तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर आहे़ गेल्या आठवड्यात कडू वस्ती व दवणगाव रस्त्यालगत बिबट्या आढळला होता़

Web Title: Dogs injured in dogs attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.