श्वानांना लोखंडी रॉडने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:47 IST2021-09-02T04:47:23+5:302021-09-02T04:47:23+5:30
अहमदनगर : एका तरुणाकडून वैदुवाडी परिसरात रस्त्यावरील श्वानांना लोखंडी रॉडने फटके दिले जात आहेत. या मुक्या प्राण्यांवरचा हा एक ...

श्वानांना लोखंडी रॉडने मारहाण
अहमदनगर : एका तरुणाकडून वैदुवाडी परिसरात रस्त्यावरील श्वानांना लोखंडी रॉडने फटके दिले जात आहेत. या मुक्या प्राण्यांवरचा हा एक प्रकारचा हल्लाच असून अनेक नागरिक या प्रकारामुळे हळहळले आहेत. मात्र तो तरुण गुंड प्रवृत्तीचा असल्याने त्याच्याविरोधात कोणतीही कृती करता येत नसल्याने नागरिक हतबल झाले असून काही नागरिकांनी पोलिसांत धाव घेतली आहे.
सावेडी परिसरातील पाईपलाईन रोडवरील वैदुवाडी परिसरात अनेक भटके श्वान आहेत. त्यांची संख्याही मोठी आहे. वैदुवाडी परिसरात एक तरुण हातात लोखंडी रॉड घेऊन फिरत असतो. तो तरुण या श्वानांना रॉडने फटके देतो. या तरुणाच्या विरोधात कोणीही बोलत नाही. त्याच्या हातात रॉड असल्याने नागरिक बोलायला घाबरतात. मात्र या मुक्या प्राण्यांना मारलेले पाहून अनेक नागरिक हळहळत आहेत. मात्र त्या निर्दयी तरुणावर कारवाई कोण करणार ? अशी नागरिकांना चिंता आहे. तसेच काही नागरिकांनी या प्रकाराबाबत श्वान प्रेमी संघटनांकडे धाव घेतली आहे.