डॉक्टरचा वैद्यकीय परवाना निलंबित
By Admin | Updated: October 27, 2023 16:46 IST2014-05-14T23:35:53+5:302023-10-27T16:46:59+5:30
संगमनेर : गर्भलिंग निदान व प्रणवपूर्व प्रसूती कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरविलेल्या शहरातील अभिजीत हॉस्पिटलचे गायकवाड यांचा वैद्यकीय परवाना तात्पुरता निलंबित केला आहे.

डॉक्टरचा वैद्यकीय परवाना निलंबित
संगमनेर : गर्भलिंग निदान व प्रणवपूर्व प्रसूती कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरविलेल्या शहरातील अभिजीत हॉस्पिटलचे डॉ. आर. एम. गायकवाड यांचा वैद्यकीय परवाना महाराष्टÑ मेडिकल कौन्सिलने तात्पुरता निलंबित केला आहे. २००९ साली गायकवाड यांनी गर्भलिंग निदान व प्रणवपूर्व प्रसूती कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायालयात खटला चालू होता. तरीही गायकवाड यांनी आपला वैद्यकीय व्यवसाय सुरुच ठेवला. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षीका डॉ. सुचिता गवळी यांनी पोलिसात तक्रार देत अभिजीत हॉस्पिटलवर छापा टाकला. छाप्यात गर्भपात करण्यासाठी बाहेर गावाहून आलेल्या तीन महिलांचे जबाब नोंदविण्यात आले. गायकवाड यांच्या विरोधातील हा दुसरा खटला न्यायालयात चालू आहे. त्यात गायकवाड यांच्यावरील आरोप सिध्द झाल्याने न्यायाधीश आर. एम. राठोड यांनी गायकवाड यांना दोषी ठरवत डिसेंबर (२०१३) मध्ये तीन महिने कैदेसह पाच हजार रुपये दंड ठोठावला होता. त्या अनुषंगाने गायकवाड यांचा वैद्यकीय परवाना २६ डिसेंबर २०१३ रोजी महाराष्टÑ मेडिकल कौन्सिलने तात्पुरता निलंबित केला. गायकवाड यांचा परवाना निलंबित करण्याचे आदेश ५ मे २०१४ रोजी गवळी यांनी दिले़ (प्रतिनिधी) न्यायालयाच्या निकालानुसार मेडिकल कौन्सिलने गायकवाड यांचा वैद्यकीय परवाना निलंबित केल्याचे आदेश २६ डिसेंबर २०१३ रोजी काढले. राज्य कुटुंब कल्याण विभागाच्या पत्रान्वये जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षीका गवळी यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. मात्र गवळी यांनी ४ महिने उलटल्यावर ५ मे २०१४ रोजी हा आदेश बजावला. गर्भलिंग निदान व प्रणवपूर्व प्रसूती कायद्याच्या उल्लंघनप्रकरणी न्यायालयात दोषी ठरलेल्या डॉ. आर.एम. गायकवाड यांचा वैद्यकीय परवाना महाराष्टÑ मेडिकल कौन्सिलने निलंबित केला आहे. -डॉ. सुचिता गवळी, वैद्यकीय अधीक्षीका