डॉक्टरांचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:21 IST2021-05-23T04:21:06+5:302021-05-23T04:21:06+5:30
जशी शरीराची काळजी महत्त्वाची तशी मनाची काळजीही महत्त्वाची. मन सुदृढ राहणे, प्रसन्न राहणे ही कोरोना काळात अत्यंत महत्त्वाची गोष्ट ...

डॉक्टरांचा सल्ला
जशी शरीराची काळजी महत्त्वाची तशी मनाची काळजीही महत्त्वाची. मन सुदृढ राहणे, प्रसन्न राहणे ही कोरोना काळात अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मन प्रसन्न राहण्यासाठी खालील काही गोष्टी आपण करू शकतो.
1. नियमित व्यायाम, नियमित झोप, संतुलित आहार या तीन गोष्टींचे अचूक पालन करा
2. सकाळच्या वेळेचा सूर्यप्रकाश हा मेंदूतील सिरेटोनिन वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतो. सिरेटोनिन मन उत्साही व प्रसन्न राहण्यासाठी आवश्यक असते.
3. घरच्यांबरोबर जास्त काळ व्यतीत करा. मुलांबरोबर खेळा, घरच्या कामात मदत करा.
4. छंद जोपासना : वैयक्तिक छंद जोपासल्याने मन प्रसन्न राहते.
5. वाचन, संगीत, नाट्य इत्यादी छंद जोपासणे.
6. सध्या लॉकडाऊनमुळे अनेकजण घरात आहेत. भरपूर वेळही आहे. अशामध्ये वेळेचा सदुपयोग करणे गरजेचे आहे.
7. व्यसनांपासून नेहमीच दूर राहावे.
8. सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. जसे आपण विचार करतो तसे आपल्या मेंदूतील रासायनिक द्रव्यांमध्ये बदल होतात. सकारात्मक विचार केल्यास सकारात्मक रस मेंदूमध्ये तयार होतात व मन प्रसन्न राहते.
.............
- डॉ. नीरज करंदीकर, मानसोपचार तज्ज्ञ