डॉक्टरांचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:15 IST2021-06-20T04:15:43+5:302021-06-20T04:15:43+5:30
१)एचआरसीटी स्कॅन कोविड संसर्गामुळे फुफ्फुसाला निमोनियाचा संसर्ग झाला आहे का ? याची माहिती देतात. या प्रकारच्या निदानाची गरज असल्यास ...

डॉक्टरांचा सल्ला
१)एचआरसीटी स्कॅन कोविड संसर्गामुळे फुफ्फुसाला निमोनियाचा संसर्ग झाला आहे का ? याची माहिती देतात. या प्रकारच्या निदानाची गरज असल्यास आपले डॉक्टर आपल्याला सल्ला देतील. त्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानुसारच सीटी स्कॅन करावेत.
२) कोविड संसर्गाची लक्षणे दिसू लागल्यावर ३-४ दिवसानंतर एचआरसीटी स्कॅनमध्ये संसर्गाचा पुरावा दिसू शकतो.
सीटी स्कॅन तीन भागात संसर्गाची वर्गवारी करते.
अ) सौम्य संसर्ग (० ते ८ संख्या)
ब) मध्यम संसर्ग (० ते १५ संख्या)
क) गंभीर संसर्ग (१६ ते २५ संख्या)
या वर्गवारीमुळे रुग्णास कोणते उपचार करायचे आहेत. त्याला गृह विलगीकरण करायचे की दवाखान्यात भरती करायचे आहे, याची सुस्पष्ट जाणीव डॉक्टरांना होते.
३) एचआरसीटी स्कॅनच्या मदतीने कोविड व्यतिरिक्त होणारे संसर्गाचे देखील निदान होते. कोविड संसर्गामुळे लंग फायब्रोसीस सारख्या दीर्घ शारीरिक गुंतागुंतीचे देखील निदान होते.
४)काहीवेळा कोविडची सर्व लक्षणे असताना आरटीपीसीआर व रॅपिड ॲन्टिजन टेस्ट नकारात्मक येते. अशावेळी एचआरसीटी स्कॅन फुफ्फुसातील संसर्ग व गतीविधी ओळखायला मदत करतो.
५) गर्भवती कोविड रुग्णांनी आत्यंतिक गरज असल्यासच एचआरसीटी करावी. अशावेळी त्यांच्या पोटाच्या भागावर लीड या धातूचे आवरण घालावे.
६) आधुनिक एचआरसीटी मशीनमध्ये किरणोत्सर्गाशी संपर्क कमीत कमी येतो. तो साधारण ३ एक्स- रेच्या बरोबरचा असतो. तरीही फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ही चाचणी करावी. रुग्णाने अशा बाबतीत स्वत: चाचणीचे निर्णय घेऊ नयेत.
७) जे रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. एका जागी खिळलेले आहेत. म्हणजेच ज्यांच्यात गंभीर संसर्ग आहे, अशा रुग्णांचे निदान एक्स-रेद्वारे उत्तम प्रकारे होऊ शकते. मात्र संसर्ग कमी असल्यास तो एक्स-रेमध्ये टिपता येत नाही.
-डॉ. सुहास घुले