उपचारासह डॉक्टर देतात पाणी बचतीचा सल्ला
By Admin | Updated: May 24, 2016 23:41 IST2016-05-24T23:29:52+5:302016-05-24T23:41:22+5:30
अहमदनगर : राज्यासह नगर जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेत डॉक्टरांनीही पाणीबचतीची मोहीम हाती घेतली असून, उपचारासह रुग्णांना पाणीबचतीचाही सल्ला देण्यात येत आहे़

उपचारासह डॉक्टर देतात पाणी बचतीचा सल्ला
अहमदनगर : राज्यासह नगर जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेत डॉक्टरांनीही पाणीबचतीची मोहीम हाती घेतली असून, उपचारासह रुग्णांना पाणीबचतीचाही सल्ला देण्यात येत आहे़ मंगळवारी शहरातील सक्कर चौकातील मातृसेवा विमेन्स व झरेकर हॉस्पिटलमध्ये ‘लोकमत जलमित्र अभियान’ राबविण्यात आले़ मातृसेवा हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना अभियानाची संकल्पना स्पष्ट करत पाणीबचतीचे आवाहन केले़ डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला़ हॉस्पिटलचे संचालक डॉ़ बाळासाहेब देवकर यांनी तीन महिन्यापूर्वी हॉस्पिटलमधील सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन दैनंदिन कामकाजात पाणीबचतीचे नियोजन केल्याचे सांगितले़
तसेच लोकमत अभियानातंर्गत सहभागी होत हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्ण व नातेवाईकांना पाणीबचतीचा सल्ला देणार असल्याचे देवकर म्हणाले़
झरेकर हॉस्पिटलमध्येही अभियान राबविण्यात आले़ या हॉस्पिटलने पाणीबचतीचे महत्त्व लक्षात घेऊन रेनवॉटर हार्वेस्टिंगचा उपक्रम राबविला आहे़ तसेच हॉस्पिटलमध्ये येणारे रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना लागेल तेव्हढेच पाणी देण्यात येते़ पाण्याचा अपव्यय करू नका असाही सल्ला त्यांना देण्यात येतो़
या हॉस्पिटलमधील कर्मचारीही अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले़ (प्रतिनिधी)