गतवेळची पुनरावृत्ती नको

By Admin | Updated: September 3, 2014 23:57 IST2014-09-03T23:30:36+5:302014-09-03T23:57:55+5:30

अहमदनगर : जिल्हा परिषदेत स्थापन करण्यासंदर्भात अद्याप राष्ट्रवादी सोबत चर्चा झालेली नाही.

Do not repeat the past | गतवेळची पुनरावृत्ती नको

गतवेळची पुनरावृत्ती नको

अहमदनगर : जिल्हा परिषदेत स्थापन करण्यासंदर्भात अद्याप राष्ट्रवादी सोबत चर्चा झालेली नाही. मात्र, पक्षांतर्गंत मुख्यमंत्री पैथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यात चर्चा झालेली आहे. जि.प. सत्तेसाठी आघाडी करण्यास काँग्रेस तयार आहे. मात्र, गत निवडणुकीप्रमाणे फसवणूक होऊ नये, याची हमी मिळणे आवश्यक असल्याचे मत जिल्हा परिषद सदस्य सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले.
येत्या २१ तारखेला जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समितीच्या सभापतींची निवड होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. दोन्ही काँग्रेसकडून अंतर्गत बैठक झाल्या असल्या तरी दोन पक्षाच्या बैठकीला अद्याप मुहूर्त लाभलेला नाही. याबाबत तांबे यांच्याकडे पक्षीय परिस्थिती बाबत विचारणा केली.
तांबे म्हणाले की, जिल्हा परिषदेत पहिल्या अडीच वर्षासाठी पदाधिकारी यांच्या निवडी करताना राष्ट्रवादीने ऐनवेळी काँग्रेसला फसविले होते.
त्यावेळी अध्यक्षसह उपाध्यक्षपदासाठी अर्ज भरत जिल्हा परिषदेत झालेल्या मतदानात काँग्रेसला ऐकटे पाडले होते. त्याची पुनर्वृत्ती यंदा होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हा परिषदेत सत्तेसाठी राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्यास काँग्रेस तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्तेत आल्यानंतर काँग्रेसला उपाध्यक्षपदासह दोन विषय समित्या हव्या आहेत. तांबे यांनी या पूर्वी दोन जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता.
एकदा तर काँग्रेस पक्षाने त्यांच्या नावाचा पक्षादेशही काढलेला होता. मात्र, दोनदा त्यांना अध्यक्षपदाने हुलकावणी दिलेली आहे. यामुळे यंदा त्यांनी उपाध्यक्षपदाचा दावा सोडला असल्याचे जाहीर केले.
पक्षांतर्गत उपाध्यक्षपदाचा उमेदवार मंत्री थोरात आणि विखे अंतिम करतील असे त्यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)
जर..तर वर परिस्थिती अवलंबून
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे ३२ सदस्य आहेत. तर काँग्रेसचे २८ सदस्य आहेत.
राष्ट्रवादीतून आमदार बबनराव पाचपुते आणि माजी आमदार भानुदास मुरकुटे भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यांनी पक्ष सोडल्यास त्यांचे सदस्य त्यांच्या सोबत जातील अशा परिस्थितीत राष्ट्रवादीचे सदस्य बळ काँग्रेसपेक्षा कमी झाल्यास काँगे्रसकडून अध्यक्षपदावर दावा सांगितला जावू शकतो, असे तांबे म्हणाले. मात्र, ही परिस्थिती जर-तर वर अवलंबून राहील.

Web Title: Do not repeat the past

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.