दीपोत्सवाने उजाळले ज्ञानेश्वरमंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:34 IST2020-12-14T04:34:42+5:302020-12-14T04:34:42+5:30
नेवासा : संत ज्ञानेश्वरांच्या (माउली) ७२४ व्या संजीवन समाधीनिमित्त नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये रविवारी सायंकाळी दीपोत्सव करण्यात ...

दीपोत्सवाने उजाळले ज्ञानेश्वरमंदिर
नेवासा : संत ज्ञानेश्वरांच्या (माउली) ७२४ व्या संजीवन समाधीनिमित्त नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये
रविवारी सायंकाळी दीपोत्सव करण्यात आला. या दीपोत्सवाने मंदिराचे प्रवेशद्वार उजळून निघाले होते.
यावेळी श्रीक्षेत्र देवगड येथील महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्यासमवेत संत ज्ञानेश्वरमंदिराचे प्रमुख मार्गदर्शक शिवाजी महाराज देशमुख, महंत सुनीलगिरी महाराज यांच्या हस्ते ‘पैस’ खांबाचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते पैस खांबासमोर पहिला दीप लावण्यात आला. यावेळी ॐ आकाराच्या बनविण्यात आलेल्या प्रतिकृतीमध्ये नंदकिशोर महाराज खरात, नगरपंचायतचे मार्गदर्शक सतीश पिंपळे, विश्वस्त रामभाऊ जगताप, पांडुरंग अभंग, कृष्णा पिसोटे, प्रकाश सोनटक्के, डॉ. करण घुले, डॉ. वेणूनाथ महाराज वेताळ, शिवा राजगिरे, जालिंदर गवळी यांच्या हस्ते दीप लावण्यात आला.
संत ज्ञानेश्वरमंदिरामध्ये ‘पैस’ खांबास दीप अर्पण करून मंदिरावर ७२४ दीप भाविकांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आले. यावेळी वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींनी भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
फोटो ओळी
नेवासा येथे संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसरात ७२४ दिव्यांचा दीपोत्सव करण्यात आला. (छायाचित्र : सुहास पठाडे)