नगर तालुक्यातील ८ सोसायट्यांच्या निवडणुकांचा दिवाळी धमाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:24 IST2021-09-24T04:24:16+5:302021-09-24T04:24:16+5:30

केडगाव : नगर तालुक्यातील ८ सेवा संस्थाच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. संस्थाच्या निवडणुकांचा बार दिवाळीतच उडणार आहे. निवडणुकीसाठी ...

Diwali blast of 8 societies in Nagar taluka | नगर तालुक्यातील ८ सोसायट्यांच्या निवडणुकांचा दिवाळी धमाका

नगर तालुक्यातील ८ सोसायट्यांच्या निवडणुकांचा दिवाळी धमाका

केडगाव : नगर तालुक्यातील ८ सेवा संस्थाच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. संस्थाच्या निवडणुकांचा बार दिवाळीतच उडणार आहे. निवडणुकीसाठी मतदार याद्यांची जुळवाजुळव सुरू झाली आहे.

कोरोनामुळे या संस्थाच्या निवडणुका लांबल्या होत्या. तालुका उपनिबंधक सहकार यांनी नव्याने या संस्थाच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबतचा नवा अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला आहे. त्यानुसार या संस्थाच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या तयार करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत होती. या मतदार याद्या चार प्रतीत १७ सप्टेंबरपर्यंत उपनिबंधकांकडे जमा करण्याचे आदेश संबंधित संस्थांना देण्यात आले होते.

तालुक्यातील उक्कडगाव, हिवरेबाजार, जांब, बारदरी, देऊळगाव सिद्धी, दरेवाडी या गावांतील सेवा संस्थासह महापालिका कर्मचारी पतसंस्था, जि. प. कर्मचारी पतसंस्था या सहकारी संस्थाच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होणार आहेत. तालुक्यातील ३ सेवा संस्थाच्या निवडणुका या आधीच झाल्या आहेत. आता सेवा संस्था निवडणुकांसाठी ६ टप्पे करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणुकांची प्रक्रिया नव्याने सुरू करण्यात आली आहे. दोन महिन्यांच्या अवधीनंतर निवडणुकांचा टप्पा तयार केला आहे. प्रारूप मतदार याद्या तालुका उपनिबंधाकडे प्राप्त झाल्यानंतर त्या जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात येणार आहेत. यानंतर त्या याद्यांवर हरकती, प्रसिद्धी, याद्यांना अंतिम प्रसिद्धी या कार्यवाहीसाठी वेळ लागेला. त्यामुळे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुकांचा कार्यक्रम प्रसिद्ध होईल. साधारण दिवाळीतच या संस्थांच्या निवडणुकांचा बार उडणार आहे. आगामी नगर बाजार समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका होतील. यामुळे तालुक्याचे राजकारण ढवळून निघणार आहे.

---

या संस्थांच्या होणार निवडणुका

देऊळगाव सिद्धी सेवा संस्था, दरेवाडी, जांब, हिवरेबाजार, उक्कडगाव, बारदरी सेवा संस्था, मनपा कर्मचारी सोसायटी, जि. प. कर्मचारी सोसायटी.

---

पहिल्या टप्प्यात आठ सोसायट्यांच्या निवडणुका आहेत. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम लागणार आहे. एकूण सहा टप्पे आहेत. पहिल्या टप्यामधल्या ११ सोसायटी निवडणुका लागल्या आहेत. त्यापैकी तीन सोसायट्यांच्या निवडणुका झाल्या. दर दोन महिन्यांनी निवडणुकीचा टप्पा आहे. नवीन याद्या मागविण्याचे काम सुरू आहे.

-के. आर. रत्नाळे, उपनिबंधक सहकार, नगर तालुका

Web Title: Diwali blast of 8 societies in Nagar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.