शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग तरुणाचा मुळा नदीपात्रात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 16:47 IST

मुळा नदीपात्रातील डोहात पाय घसरून पडल्याने एका दिव्यांग तरुणाचा बुडून मृत्यू झाला. येथील कोतूळेश्वर मंदिराजवळ रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. भाऊराव  गणपत मेंगाळ (वय २८)असे मयत तरुणाचे नाव आहे. 

कोतूळ : मुळा नदीपात्रातील डोहात पाय घसरून पडल्याने एका दिव्यांग तरुणाचा बुडून मृत्यू झाला. येथील कोतूळेश्वर मंदिराजवळ रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. भाऊराव  गणपत मेंगाळ (वय २८)असे मयत तरुणाचे नाव आहे.  कोतूळ येथील मुळा नदीपात्रात रविवारी दुपारी चार ते पाचच्या दरम्यान संगमनेर तालुक्यातील सावरचोळ (मेंगाळवाडी) येथील पाच ते सहा लोक मासे पकडण्यासाठी कोतूळेश्वर मंदिर परिसरातील दवडोहात आले होते. दरम्यान भाऊराव हा पायाने अपंग असल्याने तो डोहाच्या कडेला मोठ्या दगडावर बसला होता. सोबतचे इतर लोक काही अंतरावर मासे पकडण्यासाठी दूरपर्यंत गेले. ते परत आले असता भाऊसाहेब हा जागेवर आढळला नाही. त्याच्या जवळचे साहित्य जागेवरच होते. सभोवताली पाहिले असता तो नदीपात्रात मृत अवस्थेत आढळून आला. अकोलेचे पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी घटनास्थळी भेट दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील साळवे, विजय खुळे यांनी घटनेची आकस्मात मृत्युची नोंद केली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोलेWaterपाणीDeathमृत्यू