दिव्यांग संघटनेच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:14 IST2021-06-30T04:14:59+5:302021-06-30T04:14:59+5:30
श्रीरामपूर : आसान दिव्यांग संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी मुश्ताक तांबोळी, उपाध्यक्षपदी सुनील कानडे व कार्याध्यक्षपदी डॉ. सतीश भट्टड यांची निवड ...

दिव्यांग संघटनेच्या
श्रीरामपूर : आसान दिव्यांग संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी मुश्ताक तांबोळी, उपाध्यक्षपदी सुनील कानडे व कार्याध्यक्षपदी डॉ. सतीश भट्टड यांची निवड करण्यात आली आहे. समन्वयकपदी विनोद कांबळे, संपर्कप्रमुखपदी डॉ. अनिल दुबे, महिला राज्याध्यक्षपदी स्नेहा कुलकर्णी, तर मूकबधिर विभाग राज्य प्रमुखपदी मुकिंद गाडेकर यांनाही कार्यकारिणीत स्थान देण्यात आले. दिव्यांग संघटनेच्या पदाधिकारी निवडीसाठी अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. संस्थेचे अध्यक्ष संजय साळवे यांनी दिव्यांग कायद्याची माहिती दिली.
कायद्याच्या अंमलबजावणीसाठी संजय गांधी निराधार योजना, स्वतंत्र पिवळे रेशन कार्ड, अंत्योदय योजना, दिव्यांगांसाठी स्वतंत्र कोरोना लसीकरण मोहीम, शासकीय इमारतीमध्ये दिव्यांगांकरिता कायद्यानुसार सुलभ सुविधा यावर चर्चा करण्यात आली.
--------