अहमदनगर : कोरोनाच्या संकट काळात केंद्र सरकारने इंधन दरवाढ केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी दुचाकी ढकलून सोमवारी निदर्शने करण्यात आली. काही ठिकाणी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढीविरोधात नियमांचे पालन करून निदर्शने करण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवकचे संगमनेर तालुकाध्यक्ष अक्षय भालेराव व शहराध्यक्ष राहुल वर्पे यांच्या नेतृत्वाखाली दुचाकी ढकलून हे आंदोलन करण्यात आले. पारनेरमध्ये तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. कोपरगाव येथे शहराध्यक्ष नवाज कुरेशी यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. अकोले तालुकाध्यक्ष रवींद्र मालूंजकर व शहराध्यक्ष रवींद्र नाईकवाडी यांच्यासह कार्यकर्त्यांनी दुचाकी ढकलत केंद्र सरकारचा निषेध केला. राहा तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे व शिर्डी शहराध्यक्ष विशाल भंडागे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. राहुरी तालुक्यात धीरज पानसंबळ यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. श्रीगोंदा येथे शहराध्यक्ष ऋषिकेश गायकवाड तर शेवगाव तालुक्यात ताहेर पटेल यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
....
कोरोनाच्या संकट काळात इंधन दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे अर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले असून, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसकडून इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. नियमांचे पालन करून हे आंदोलन करण्यात आले आहे.
- कपिल पवार, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
...
फोटो -१७ राष्ट्रवादी आंदोलन