कृषी कायद्याविरोधात जिल्हा कामगार संघटनेची निदर्शने

By | Updated: December 9, 2020 04:16 IST2020-12-09T04:16:31+5:302020-12-09T04:16:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : केंद्र शासनाच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदला पाठिंबा देत अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेने ...

District trade union protests against agricultural law | कृषी कायद्याविरोधात जिल्हा कामगार संघटनेची निदर्शने

कृषी कायद्याविरोधात जिल्हा कामगार संघटनेची निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : केंद्र शासनाच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदला पाठिंबा देत अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेने मंगळवारी निदर्शने केली. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करत पदाधिकाऱ्यांनी परिसर दणाणून साेडला.

केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले आहेत. राज्यातील शेतकरी संघटनांनी बंदची हाक देत आंदोलन केले. जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनात जिल्हा कामगार संघटना सहभागी झाली होती. आंदोलनात जिल्हा कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे, किरण दाभाडे, सुनील कदम, सागर सोनवणे, सनी शिंदे, जुबेर शेख, किरण गुंजाळ, संतोष भिंगारदिवे, अभिजित भिंगारदिवे, महेश आठवले, रोहित केदारे, नितीन कदम, शुभम भिंगारदिवे, मोना विधाते, रवी साठे, सागर मिसाळ, अविनाश वानखेडे, राहुल कसबे आदी सहभागी झाले होते.

....

सूचना फोटो आहे

Web Title: District trade union protests against agricultural law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.