शिक्षक भारती उर्दू संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:16 IST2020-12-27T04:16:16+5:302020-12-27T04:16:16+5:30

शिक्षक भारती संघटनेची बैठक नुकतीच राज्य सचिव सुनील गाडगे यांच्या उपस्थितीत झाली. याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष बाबा लोंढे, इलियास तांबोळी, ...

District executive of Shikshak Bharti Urdu Sanghatana announced | शिक्षक भारती उर्दू संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

शिक्षक भारती उर्दू संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

शिक्षक भारती संघटनेची बैठक नुकतीच राज्य सचिव सुनील गाडगे यांच्या उपस्थितीत झाली. याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष बाबा लोंढे, इलियास तांबोळी, मुख्याध्यापक खलील शेख, रफिया खान, एटीयूचे चेअरमन नज्जू पहेलवान, फिरोज खान आदी उपस्थित होते. उर्दू विभागाचे राज्याध्यक्ष मुश्ताक पटेल यांनी मार्गदर्शन केले.

कार्यकारिणी अशी : जिल्हाध्यक्ष - मोहंमद समी शेख, जिल्हा सचिव - शेख मोहंमद मुजीब, उपाध्यक्ष शेख अकिल अहमद, मुन्नवर खलील (संगमनेर), मोहंमद तन्वीर (श्रीरामपूर), कोषाध्यक्ष - खान इमरान अय्युब, सहसचिव - खान नजीब नुरईलाही, पठाण अरबाज (श्रीरामपूर), मानद सचिव - मुन्नवर हुसेन, खजिनदार - अतिक शेख कादर (कोल्हार), महिला प्रतिनिधी - इनामदार गुलनाज, मार्गदर्शक - डॉ. प्रा. सलाम सर, जाकीर सय्यद, अबुनसर सैय्यद, शेख अशफाक अहमद.

गाडगे म्हणाले की, आज शिक्षकांचे अनेक प्रश्‍न आहेत; ते सोडविण्यासाठी संघटन महत्वाचे आहे. शिक्षकांच्या प्रश्‍नांसाठी शिक्षक भारती शासनाकडे वेळोवेळी दाद मागते. प्रास्ताविक खान नजीब यांनी केले, तर सूत्रसंचालन इमरान खान यांनी केले. शेख अकिल यांनी आभार मानले.

---------

फोटो - २६उर्दू निवड

शिक्षक भारती उर्दू संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी मोहंमद समी शेख, तर सचिवपदी शेख मोहंमद मुजीब यांची निवड करण्यात आली. त्याबद्दल त्यांचा राज्याध्यक्ष सुनील गाडगे यांनी सत्कार केला.

Web Title: District executive of Shikshak Bharti Urdu Sanghatana announced