भाजप युवाच्या जिल्हा कार्यकारिणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:20 IST2021-03-05T04:20:47+5:302021-03-05T04:20:47+5:30
श्रीरामपूर : भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा कार्यकारिणीत येथील सात कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. या नियुक्तीचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ...

भाजप युवाच्या जिल्हा कार्यकारिणीत
श्रीरामपूर : भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा कार्यकारिणीत येथील सात कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. या नियुक्तीचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी स्वागत करण्यात आले. युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे यांनी या निवडी जाहीर केल्या. जिल्हा सरचिटणीसपदी विशाल यादव व उपाध्यक्षपदी रुपेश हरकल यांना संधी देण्यात आली. अक्षय नागरे (सचिव), राहुल आठवल, योगेश राऊत, वैभव ढवळे व अमोल तांबे यांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, शहराध्यक्ष मारुती बिंगले, गणेश राठी, बंडूकुमार शिंदे, राजेंद्र कांबळे, मिलिंदकुमार साळवे, विजय लांडे, अजित बाबेल, अरुण धर्माधिकारी, चंद्रकांत परदेशी, रवी पंडित, बाबूराम शर्मा, अमित मुथा, विजय नगरकर, किरण जऱ्हाड, आनंद बुधेकर, श्रेयस झिरंगे, विजय आखाडे, डॉ. ललित सावज दत्तू देवकाते, तेजस उंडे, श्रेजल त्रिवेदी आदींच्या उपस्थित सत्कार करण्यात आला. नियुक्तीबद्दल जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांचे आभार मानण्यात आले. पुढील काळात शहरासह तालुक्यात पक्ष विस्तारासाठी जोमाने काम करू, असे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी दिले.
----------
फोटो ओळी : ०४ भाजप निवड
भाजप युवा मोर्चाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, शहराध्यक्ष मारुती बिंगले व इतर.
---------