शिवभोजन केंद्राला जिल्हाधिकाऱ्यांची ‘सरप्राईज व्हिजीट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:17 IST2021-01-09T04:17:41+5:302021-01-09T04:17:41+5:30

तारकपूर येथील कृष्णा शिवभोजन केंद्रात जिल्हाधिकारी भोसले सकाळी दाखल झाले. केंद्र चालक साईनाथ घोरपडे यांच्याकडे त्यांनी नियमाप्रमाणे थाळी ...

District Collector's 'Surprise Visit' to Shivbhojan Kendra | शिवभोजन केंद्राला जिल्हाधिकाऱ्यांची ‘सरप्राईज व्हिजीट’

शिवभोजन केंद्राला जिल्हाधिकाऱ्यांची ‘सरप्राईज व्हिजीट’

तारकपूर येथील कृष्णा शिवभोजन केंद्रात जिल्हाधिकारी भोसले सकाळी दाखल झाले. केंद्र चालक साईनाथ घोरपडे यांच्याकडे त्यांनी नियमाप्रमाणे थाळी देण्यात येते का, याची माहिती घेतली. शिवाय जेवण घेत असलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. याठिकाणी जेवणासाठी येणारे काही जण कामानिमित्त आलेले असतात तर काहींचे नातेवाईक रुग्णालयात दाखल आहेत, बाहेरचा खर्च परवडत नाही, म्हणून जेवणासाठी येथे येत असतात, असे या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांना आढळून आले. शहर आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या शिवभोजन केंद्रांना आपण तसेच प्रशासनातील इतर अधिकारी वेळोवेळी भेटी देतील. शिवभोजन केंद्र चालकांनीही कोणाचीही तक्रार राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा त्यांनी सूचना केल्या.

---------

फोटो - ०८शिवभोजन भेट

तारकपूर येथील कृष्णा शिवभोजन केंद्रात जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी शुक्रवारी भेट देऊन जेवणाच्या दर्जाबाबत पाहणी केली.

Web Title: District Collector's 'Surprise Visit' to Shivbhojan Kendra