ओंकारनगर शाळेतील विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:34 IST2021-02-05T06:34:37+5:302021-02-05T06:34:37+5:30
केडगाव : जिल्हा नियोजन भवन येथे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महानगरपालिका ओंकारनगर प्राथमिक शाळेच्या प्रज्ज्वल छगन ठोकळ ...

ओंकारनगर शाळेतील विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव
केडगाव : जिल्हा नियोजन भवन येथे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महानगरपालिका ओंकारनगर प्राथमिक शाळेच्या प्रज्ज्वल छगन ठोकळ (इ.४ थी), सायली सयाजी काळे (इ.१ ली ) या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित निबंध लेखन स्पर्धा व घोषवाक्य स्पर्धेत या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. अकराव्या राष्ट्रीय मतदारदिनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पार पडलेल्या मतदार दिनाच्या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, संदीप निचित, उपविभागीय पोलीस अधिकारी धुमे, उपवनसंरक्षक डॉ. आदर्श रेड्डी, इतिहास अभ्यासक प्रा. संतोष यादव, प्रांताधिकारी पल्लवी निर्मळ, सुधाकर भोसले, माध्यमिक शिक्षणाधिकारी रामदास हराळ, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी विलास साठे, मनपा उपायुक्त संतोष लांडगे, मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी, सहशिक्षक शिवराज वाघमारे उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी सुभाष पवार, पर्यवेक्षक जुबेर पठाण, मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी, सहशिक्षक शिवराज वाघमारे, सहशिक्षिका वृषाली गावडे यांनी मार्गदर्शन केले होते.
फोटो : ३१ ओंकारनगर
केडगावच्या ओंकारनगर शाळेतील विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सन्मान केला.