जिल्हाधिकाऱ्यांनी दिली देवळाली प्रवराला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:21 IST2021-01-23T04:21:31+5:302021-01-23T04:21:31+5:30
अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या राहुरी फॅक्टरी येथील प्रलंबित असणारा प्रश्न जिल्हा अधिकारी राजेंद्र भोसले यांनी देवळाली नगरपालिकेला प्रथमच भेट ...

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली देवळाली प्रवराला भेट
अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या राहुरी फॅक्टरी येथील प्रलंबित असणारा प्रश्न जिल्हा अधिकारी राजेंद्र भोसले यांनी देवळाली नगरपालिकेला प्रथमच भेट देऊन प्रश्न चुटकीशी सोडवला. यावेळी माजी आमदार चंद्रशेखर कदम, नगराध्यक्ष सत्यजित कदम, उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, नगरसेवक बाळासाहेब खुरुड, तुषार शेटे, भारत शेटे, मुख्य अधिकारी अजित निकत हजर होते.
यावेळी माजी आमदार चंद्रशेखर कदम आणि देवळाली नगरपालिकेचे नगराध्यक्ष यांनी जिल्हा जिल्हाधिकारी यांचे सन्मान केला. प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार एफ. आर. शेख, राहुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्रीनिवास कुरे, तलाठी दीपक साळवे उपस्थित होते.