पोटनिवडणुकीतील उमेदवारांना चिन्हांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2015 14:05 IST2015-12-31T14:05:11+5:302015-12-31T14:05:26+5:30

महापालिका पोटनिवडणुकीच्या रिंगणात असणार्‍या उमेदवारांना बुधवारी चिन्हांचे वाटप करण्यात आले.

Distribution of symbols to candidates of bye-election | पोटनिवडणुकीतील उमेदवारांना चिन्हांचे वाटप

पोटनिवडणुकीतील उमेदवारांना चिन्हांचे वाटप

 

अहमदनगर : महापालिका पोटनिवडणुकीच्या रिंगणात असणार्‍या उमेदवारांना बुधवारी चिन्हांचे वाटप करण्यात आले. प्रभाग ११ मध्ये चार तर १५ मध्ये ८ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. आघाडीत बिघाडी होण्याबरोबरच प्रभाग ११ मध्ये आघाडीच्याच नगरसेविका पुत्राने बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली. 
प्रभाग ११ मध्ये सेनेचे योगीराज गाडे, कॉँग्रेसचे रॉबीन साळवे, राष्ट्रवादीच्या शोभा बोरकर यांना पक्षाचे चिन्ह मिळाले. महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती कलावती शेळके यांचे पूत्र चंदक्रांत शेळके यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. बोरकर यांना सेना-कॉँग्रेससोबतच शेळके यांच्या बंडखोरीचाही सामना करावा लागणार आहे. 
प्रभाग १५ मध्ये आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. कॉँग्रेसच्या शीला दीप चव्हाण, राष्ट्रवादीच्या भारती भोसले, भाजपच्या कमल साबळे, रिपाइंच्या जयश्री शिंदे यांच्यासोबतच चार अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत. त्यात माजी नगरसेविका गिरीजा उडाणशिवे यांचाही समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त भालचंद्र बेहेरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी एस. बी. तडवी यांनी उमेदवारांना बुधवारी चिन्हांचे वाटप केले. 
(प्रतिनिधी)

 

Web Title: Distribution of symbols to candidates of bye-election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.