परिचारिकांना सनकोट, महिलांना स्वेटरचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:19 IST2021-03-15T04:19:53+5:302021-03-15T04:19:53+5:30
अहमदनगर : जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालकल्याण समितीच्या सभापती लता शेळके यांच्या पुढाकाराने महानगरपालिकेच्या बाळासाहेब देशपांडे दवाखान्यातील ...

परिचारिकांना सनकोट, महिलांना स्वेटरचे वाटप
अहमदनगर : जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालकल्याण समितीच्या सभापती लता शेळके यांच्या पुढाकाराने महानगरपालिकेच्या बाळासाहेब देशपांडे दवाखान्यातील परिचारिकांना सनकोट व महिलांना स्वेटर व स्कार्फचे वाटप करण्यात आले.
यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपमहापौर मालन ढोणे, सभापती लता शेळके, उपसभापती सुवर्णा गेनप्पा, स्थायी समितीच्या सदस्या रीता भाकरे, नगरसेविका ज्योती गाडे, नगरसेविका मंगला लोखंडे, नगरसेविका मीना चोपडा, मुख्य कार्यकारी सतीश राजूरकर आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर म्हणाले, कै. बाळासाहेब देशपांडे दवाखान्यातील कर्मचारी चांगले काम करत आहेत. सामान्य नागरिकांना या दवाखान्याची मदत होते. येथील रूग्णसेवा चांगली असल्याने सर्वसामान्य कुटुंबातील लोक तपासणीकरीता येतात. दवाखान्यातील कर्मचारी हे गोर-गरीबांकरीता पुण्याईचे काम करत आहेत. महिला व बालकल्याण समितीने केलेला सत्कार हा कर्मचाऱ्याकरीता कौतुकाची थाप आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिपमाला चव्हाण यांनी केले.
---
फोटो- १४ बाळासाहेब देशपांडे
जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालकल्याण समितीच्यावतीने महानगरपालिकेच्या बाळासाहेब देशपांडे दवाखान्यातील परिचारिकांना सनकोट व बाळंतिण महिलांना स्वेटर व स्कार्फचे वाटप महापौर बाबासाहेब वाकळे व आयुक्त शंकर गोरे यांच्या हस्ते झाले.