पळशी येथे शालेय साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:21 IST2020-12-22T04:21:08+5:302020-12-22T04:21:08+5:30
पारनेर : संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त पारनेर तालुक्यातील पळशी येथील विठ्ठल मंदिर परिसरासमोर प्रयास ग्रुपच्या वतीने शालेय साहित्य वाटप ...

पळशी येथे शालेय साहित्य वाटप
पारनेर : संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त पारनेर तालुक्यातील पळशी येथील विठ्ठल मंदिर परिसरासमोर प्रयास ग्रुपच्या वतीने शालेय साहित्य वाटप केले.
प्रयास फाउंडेशनचे अध्यक्ष प्रसन्न पवार व जुना मळा शाळेचे मुख्याध्यापक व प्रयासचे सदस्य प्रमोद झावरे यांनी पळशी येथे जनजागृती केली.
शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितीन जाधव व सहशिक्षक अरुण डहाळे यांच्या वतीने परिसरातील मुलांना शालेय साहित्याचे घरोघरी जाऊन वाटप केले. शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
या उपक्रमास नितीन खेडकर, अंबादास झावरे, रवींद्र पायमोडे, राजेंद्र दाते, राजेंद्र ठुबे, मंगेश खिलारी, प्रवीण झावरे, मिठू जाधव, रामचंद्र जाधव, संतोष जाधव, गणेश मधे, अप्पासाहेब शिंदे, अमोल जाधव, नंदू साळवे, भाऊसाहेब बर्डे, नंदू शिंदे, सुभाष नागवडे, तेजस जाधव, कुणाल जाधव, वैशाली जाधव, कल्पना जाधव, तनुजा जाधव, गणेश पादीर, गणेश पवार, जावेद सय्यद, प्रसाद शिंदे, वैभव चव्हाण आदींचे पाठबळ मिळाले.