महात्मा फुले कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:19 IST2021-03-21T04:19:33+5:302021-03-21T04:19:33+5:30
डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात हा कार्यक्रम पार पडला. शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांनी स्वतःला गरजेच्या वेळी मिळालेल्या ...

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण
डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात हा कार्यक्रम पार पडला. शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांनी स्वतःला गरजेच्या वेळी मिळालेल्या मदतीची जाण पुढील आयुष्यभर ठेवावी. आपणास शक्य असेल त्या परीने समाजासाठी उत्तम कार्य करुन परतफेड करणे आवश्यक आहे. मुकुल माधव फाउंडेशनतर्फे महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ३६ पदवी, २० पदव्युत्तर आणि ३ आचार्य पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या गरजू आणि होतकरु अशा शेतकऱ्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते, असेही कुलगुरु डॉ. पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी डॉ. अशोक फरांदे, डॉ. मिलिंद अहिरे, डॉ. प्रमोद रसाळ, डॉ. दिलीप पवार, डॉ. सचिन नलावडे उपस्थित होते. प्रा. सुनिल फुलसावंगे यांनी सूत्रसंचालन केले.
..
२० एमपीएससी स्कॉलर
..
मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्व. श्रीमती मोहिनी प्रल्हाद छाब्रिया शिष्यवृत्तीचे वितरण कुलगुरु डॉ. प्रशांत पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. याप्रसंगी समवेत प्राध्यापक, शास्त्रज्ञ.