आरोग्य कर्मचारी, पोलिसांना मास्कसह सुरक्षा साहित्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:21 IST2021-04-20T04:21:18+5:302021-04-20T04:21:18+5:30
राहाता : कोरोनाच्या काळात आरोग्य सेवा व पोलीस प्रशासन हे महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे राहाता नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ममता ...

आरोग्य कर्मचारी, पोलिसांना मास्कसह सुरक्षा साहित्याचे वाटप
राहाता : कोरोनाच्या काळात आरोग्य सेवा व पोलीस प्रशासन हे महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे राहाता नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा यांच्या अभीष्टचिंतनाचे औचित्य साधून राहाता शहरातील आरोग्य प्रशासन, पोलीस प्रशासन यांना मास्क व सॅनिटायझर, हॅंडग्लोज व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.
राहाता पोलीस विभागाच्यावतीने पोलीस निरीक्षक सुभाष भोये तसेच सहायक पोलीस निरीक्षक विशाल कंडारे, पोलीस उपनिरिक्षक संतोष पगारे यांनी नगराध्यक्षा ममता पिपाडा यांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी मास्क व सॅनिटायझर देऊन ऋण व्यक्त केले. राहाता ग्रामीण रुग्णालयात जीवाची पर्वा न करता कोरोनाच्या चाचण्या करणाऱ्या तसेच लसीकरण करणाऱ्या परिचारिकांना मास्क व सॅनिटायझर देण्यात आले. तसेच कोरोना चाचणीसाठी आलेल्या रुग्णांनाही मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले. यानिमित्ताने डॉ. संजय उबाळे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी डॉ. राजेंद्र पिपाडा, डॉ. गोकुळ घोगरे, डॉ. स्वाती म्हस्के, गटनेते विजय सदाफळ, दशरथ तुपे, सचिन मेहेत्रे उपस्थित होते.