वाढदिवसानिमित्त डॉक्टरांना पीपीई किटचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:21 IST2021-05-20T04:21:17+5:302021-05-20T04:21:17+5:30

तालुक्यातील कोठे खुर्द येथील शेतकरी सहदेव लक्ष्मण घुले यांची कन्या पूनम सहदेव घुले ही पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात ओतूर ...

Distribution of PPE kits to doctors for birthdays | वाढदिवसानिमित्त डॉक्टरांना पीपीई किटचे वाटप

वाढदिवसानिमित्त डॉक्टरांना पीपीई किटचे वाटप

तालुक्यातील कोठे खुर्द येथील शेतकरी सहदेव लक्ष्मण घुले यांची कन्या पूनम सहदेव घुले ही पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात ओतूर येथील गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेत शिक्षिका आहे. तिचा मंगळवारी एकविसावा वाढदिवस होता. सध्या कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. या काळात डॉक्टर,नर्स आणि आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कोरोनाशी लढा देत आहेत. या कोरोना योद्धयांना संरक्षण म्हणून पूनम हिने वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून घारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व साईसिद्धी कोविड केअर सेंटर येथील डॉक्टर,नर्स आणि आरोग्य कर्मचारी यांना ५० पीपीई किट सुपूर्द केल्या. यावेळी डॉ. अमृता पाटील, डॉ.राहुल आहेर, शिवाजी डुंबरे, शकुंतला जाधव यांसह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

.....

वाढदिवस साजरा करून क्षणिक आनंद घेण्यापेक्षा हा खर्च न करता कोरोनाच्या संकटकाळी सामाजिक बांधिलकी म्हणून कोरोना विरोधात लढणाऱ्या योद्धयांना पीपीई किट दिल्या.

– पूनम घुले.

Web Title: Distribution of PPE kits to doctors for birthdays