पळवे येथे विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:35 IST2021-02-05T06:35:22+5:302021-02-05T06:35:22+5:30
पळवे : पारनेर तालुक्यातील श्री भैरवनाथ विद्यालय, पळवे येथे माजी सैनिक अंबादास तरटे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत मास्कचे ...

पळवे येथे विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप
पळवे : पारनेर तालुक्यातील श्री भैरवनाथ विद्यालय, पळवे येथे माजी सैनिक अंबादास तरटे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत मास्कचे वाटप करण्यात आले.
इयत्ता पाचवी ते दहावीचे वर्ग आता नियमित भरू लागले आहेत. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची उपस्थिती चांगली आहे. त्यांच्या आरोग्याची तपासणी नियमित करूनच शाळेत प्रवेश दिला जातो. शिवाय, प्रत्येक विद्यार्थ्याला मास्क वापरणे बंधनकारक असल्याने सामाजिक कार्यकर्ते तसेच आजी-माजी सैनिक संस्थेचे अध्यक्ष अंबादास तरटे, आजी-माजी सैनिकांनी पळवे विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप केले.
यावेळी अंबादास तरटे, मुख्याध्यापक राजेंद्र गोरे, बाबासाहेब शेळके, गोरख गाडीलकर, शांताराम तरटे, संजय शेलार, भीमाजी शेळके, चंद्रभान गवळी, प्रसाद तरटे, रोहिदास गुंड, अमोल शेळके, रामदास इरकर, प्रवीण शेळके, विजय जगताप, रवी नवले आदी उपस्थित होते.
फोटो ओळ ३० पळवे
पळवे विद्यालयात विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करताना माजी सैनिक अंबादास तरटे, मुख्याध्यापक राजेंद्र गोरे.