वंजारवाडी शाळेत मास्क, सॅनिटायझरचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:21 IST2021-03-05T04:21:54+5:302021-03-05T04:21:54+5:30

अहमदनगर : वंजारवाडी (ता. नेवासा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकसहभागातून विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी ...

Distribution of masks and sanitizers in Vanjarwadi school | वंजारवाडी शाळेत मास्क, सॅनिटायझरचे वाटप

वंजारवाडी शाळेत मास्क, सॅनिटायझरचे वाटप

अहमदनगर : वंजारवाडी (ता. नेवासा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकसहभागातून विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी कराड, वंजारवाडीच्या सरपंच सुनंदा दराडे यांच्या हस्ते करण्यात आले.

वंजारवाडी शाळेतील उपक्रमशील पदवीधर शिक्षिका चंदना सोनवणे यांनी त्यांच्या स्वच्छता रक्षक समिती या सोशल ग्रुपवर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मास्क व सॅनिटायझरची मागणी केली होती. त्यानुसार समितीतील सदस्या रीचा शर्मा, गीता कपूर व निशा अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांसाठी १५० मास्क व १० लिटर सॅनिटायझर उपलब्ध करून दिले. हे साहित्य कराड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख जाधव, योगेश महामिने, वंजारवाडी शाळेचे मुख्याध्यापक विश्वनाथ कुसळकर आदी उपस्थित होते.

सोनवणे यांच्या उपक्रमाचे जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख, सुरेखा साळवे, पंचायत समिती सदस्य मीनाक्षी सोनवणे, गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे, शिक्षण विभागाच्या हेमलता गलांडे आदींनी कौतुक केले.

०४ वंजारवाडी शाळा

Web Title: Distribution of masks and sanitizers in Vanjarwadi school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.