कोळगाव आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी रक्षक किटचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:26 IST2021-09-12T04:26:31+5:302021-09-12T04:26:31+5:30
विसापूर : सध्या कोरोनामुळे बऱ्याच नागरिकांचा रोजगार गेलेला असून, गरजू कुटुंबातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्राचा आधार घ्यावा लागत आहे. ...

कोळगाव आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी रक्षक किटचे वाटप
विसापूर : सध्या कोरोनामुळे बऱ्याच नागरिकांचा रोजगार गेलेला असून, गरजू कुटुंबातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्राचा आधार घ्यावा लागत आहे. परंतु, उपचाराच्या वेळी राहण्यासाठी काही रुग्णांची गैरसोय होत असे. त्या प्रश्नावर कोळगाव येथील रक्षक फाउंडेशनच्या वतीने पर्यायी व्यवस्था म्हणून रक्षक किट तयार करून त्याचे वाटप करण्यात आले. या किटमध्ये मास्क, ब्लँकेट, साबण, कपडे धुण्यासाठी साबण, खोबरे तेल, शॅम्पू, कोलगेट, ब्रश, बिस्कीट, आदी साहित्यांचे किट तयार करून ते प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘एक हात मदतीचा’ या उद्देशाने दिले आहे. यावेळी डॉ. प्राजक्ता निमसे, हनुमंत श्रीखंडे, रक्षक फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश गाडेकर, उपाध्यक्ष ॲड. अभयसिंह भोस, सचिव प्रशांत बांदल, संपर्कप्रमुख मनोज गाडेकर, आदी उपस्थित होते.
110921\img_20210911_141309.jpg
रक्षक फाऊंडेशन तर्फे कोळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी रक्षक किट चे वाटप करण्यात आले.