खावटी अनुदान योजनेंतर्गत किराणा वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:18 IST2021-07-17T04:18:22+5:302021-07-17T04:18:22+5:30
तिसगाव : पाथर्डी तालुक्यात आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनातून अनुसूचित जमातीच्या ४८८ लाभार्थ्यांना आदिवासी विभाग अंतर्गत खावटी अनुदान योजनेतून ...

खावटी अनुदान योजनेंतर्गत किराणा वाटप
तिसगाव : पाथर्डी तालुक्यात आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनातून अनुसूचित जमातीच्या ४८८ लाभार्थ्यांना आदिवासी विभाग अंतर्गत खावटी अनुदान योजनेतून अन्नधान्य, किराणा साहित्य मंजूर झाले आहे. प्रातिनिधिक स्वरूपात त्याचे वितरण श्री क्षेत्र हनुमान टाकळी (ता.पाथर्डी) येथे बुधवारी करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, वृद्धेश्वरचे संचालक कुशीनाथ बर्डे, रमेशआप्पा महाराज, पंचायत समिती सभापती सुनीता दौंड, एकनाथ आटकर, खरेदी विक्री संघाचे संचालक सुभाष बर्डे, सरपंच मीना शिरसाठ, चारुदत्त वाघ, अमोल गवळी, भास्कर नेहुल आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रकल्प समन्वयक सुनील खेडकर यांनी केले. ग्रामसेवक प्रमोद म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष बर्डे यांनी आभार मानले. कानिफ पाठक, रमेश भुसारी, प्रवीण शिरसाठ, नीलेश काजळे, बाळासाहेब बर्डे, अस्लम सय्यद, संजय डमाळ, प्रल्हाद जाधव, सचिन बर्डे, प्रदीप दळवी आदी उपस्थित होते.