शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार लोककलावंत कुटुंबांना किराणा वाटप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 11:21 IST

ग्रामीण विकास केंद्र जामखेड, कोरो (मुंबई) या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने वंचित, भटके, आदिवासी, कलावंत अशा एक हजार कुटुंबांना धान्य, किराणा मालाचे वाटप केल्याची माहिती डॉ. अरुण जाधव यांनी दिली.

जामखेड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्रामीण विकास केंद्र जामखेड, कोरो (मुंबई) या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने वंचित, भटके, आदिवासी, कलावंत अशा एक हजार कुटुंबांना धान्य, किराणा मालाचे वाटप केल्याची माहिती डॉ. अरुण जाधव यांनी दिली.जामखेड शहरातील कुंभारतळे, मिलिंदनगर, तपनेश्वर गल्ली, कान्होपात्रा नगर यासह तालुक्यातील भवरवाडी, मोहा, खांडवी, खर्डा, पिंपळगाव आवळा, वाकी, बाळगव्हान आदी गावात किराण्याच्या किटचे वाटप करण्यात आले. कर्जत शहर व तालुक्यातील पाटेवाडी, तळवडी, कुळधरण, हंडाळवाडी, निमगाव डाकू, चापडगावसह श्रीगोंदा शहर व तालुक्यातील ढोकराई, पारगाव, संतवाडी, लोणी व्यंकनाथ, आढळगाव, टाकळी लोणार, कोसे गव्हाण आदी गावातील दलित, आदिवासी, भटके विमुुक्त समाजातील कैकाडी, वडार, पारधी, नाथपंथी डवरी गोसावी, कोल्हाटी, भिल्ल व पारधी अशा वंचित घटकांतील कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. जामखेड येथील लोककलावंत अनिता जाधव, गौरी शिंदे, काजल माने, शीतल जाधव, आशा कांबळे, सोनाली काळे, रेश्मा घरफोडे, शामल जाधव यांनी गहू, तांदूळ, साखर, चहा पावडर, चना डाळ, शेंगदाणे, तेल, तिखट, मीठ, साबण आदी जीवनावश्यक वस्तूंचे एक हजार किट तयार केले. यासाठी बापू ओहोळ यांचेही मार्गदर्शन लाभले. ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे कार्यकर्ते वैजीनाथ केसकर, राकेश साळवे, संतोष चव्हाण, सचिन भिंगारदिवे, सागर भांगरे, द्वारका पवार, अरुण डोळस, सोमनाथ भैलुमे, अ‍ॅड. विकास शिंदे, जालिंदर शिंदे, मनीषा काळे, विशाल जाधव, अमोल अंधारे, केशव जाधव, मच्छिंद्र जाधव, संतोष भोसले, विशाल पवार, तुकाराम पवार, संगीता केसकर, काजोरी पवार, सुशीला ढेकळे, स्वाती हापटे, शिल्पा पारवे, शुभांगी राऊत, लता सावंत आदींनी गावोगावच्या गरजू कुटुंबांना घरपोहोच साहित्य वाटप केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांचे होणारे हाल डॉ. अरुण जाधव यांनी मुंबईतील कोरो या स्वयंसेवी संस्थेच्या निदर्शनास आणून दिले. यामुळे कोरो संस्थेचे संचालक महेंद्र रोकडे व मुमताज शेख यांनी आर्थिक मदत केली. ग्रामीण विकास केंद्रानेही गरजूंना मदतीचा हात दिला. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य