राजापूर परिसरात दीडशे कुटुंबांना किराणा वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:19 IST2021-07-25T04:19:11+5:302021-07-25T04:19:11+5:30
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर, मेंगलवाडी, शेळकेवाडी येथील वीटभट्टी कामगार, कातकरी समाजातील गरजू कुटुंब तसेच कोरोनाची झळ बसलेल्या कुटुंबांना ...

राजापूर परिसरात दीडशे कुटुंबांना किराणा वाटप
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर, मेंगलवाडी, शेळकेवाडी येथील वीटभट्टी कामगार, कातकरी समाजातील गरजू कुटुंब तसेच कोरोनाची झळ बसलेल्या कुटुंबांना ओपस रूरल फाउंडेशन व सार्थक वेलफेअर फाउंडेशन मार्फत दीडशे किराणा किटचे वाटप करण्यात आले .
ओपस रूरल फाउंडेशन व सार्थक वेलफेअर फाउंडेशन पुणे यांच्या माध्यमातून राजापूर, ढवळगाव या गावांची विविध योजना राबविण्यासाठी निवड केली आहे. त्या माध्यमातून राजापूर, मेंगलवाडी, शेळकेवाडी, कवाष्टे मळा, निळोबानाला येथील १५० गरजवंत कुटुंबांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. यापूर्वी १५० किराणा किट वाटण्यात आले होते. पुढील काळात फाउंडेशन मार्फत या गावात महिला सबलीकरण, आरोग्य व्यवस्थापन, गरीब मुलींना शैक्षणिक मदत, तरुणांना रोजगार व व्यावसायिक प्रशिक्षण ओपस साॅफ्टवेअर सोल्युशनचे डायरेक्टर रमेश मेंगवडे यांच्या मार्गदर्शनाखाली देणार असल्याचे प्रोजेक्ट मॅनेजर अक्षय खोल्लम यांनी सांगितले.
यावेळी संग्राम मदने, उद्योजक अशोक ईश्वरे, बाळासाहेब वीर, धनंजय मेंगवडे, नंदकुमार मेंगवडे, चंद्रकांत घावटे, विनायक शेळके, अतुल शेळके, दादाभाऊ शेळके, सचिन धावडे आदी उपस्थित होते.
----
२४ राजापूर
राजापूर येथे किराणा किटचे वाटप करताना ओपस रूरल फाउंडेशनचे सदस्य.
240721\img-20210723-wa0036.jpg
राजापूर येथे ओपस व सार्थक फाउंडेशन मार्फत किराणा वाटप करण्यात आले . छायाचित्र - संदीप घावटे )