श्री इम्पेक्स फर्निचर मॉलकडून गरजूंना किराणा वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:16 IST2021-05-28T04:16:34+5:302021-05-28T04:16:34+5:30

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून श्रीरामपूरमध्ये सुरू असलेल्या लॉकडाऊनचा फटका गोरगरीब, हातावर पोट असलेले कामगारवर्गाला बसलेला ...

Distribution of groceries to the needy from Mr. Impex Furniture Mall | श्री इम्पेक्स फर्निचर मॉलकडून गरजूंना किराणा वाटप

श्री इम्पेक्स फर्निचर मॉलकडून गरजूंना किराणा वाटप

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून श्रीरामपूरमध्ये सुरू असलेल्या लॉकडाऊनचा फटका गोरगरीब, हातावर पोट असलेले कामगारवर्गाला बसलेला आहे. एकीकडे कोरोनाचे थैमान असताना दुसरीकडे शहरातील दाते आपापल्या परीने गोरगरिबांची मदत करत आहेत. श्री. इम्पेक्स फर्निचर मॉलचे मालक अविनाश कुदळे याच्या सहकार्यातून गरजवंत कुटुंबांना सोशल सर्व्हिस फाउंडेशनच्या माध्यमातून ही मदत पोहच करण्यात आली. तसेच शिक्षक नितीन यशवंत यांनीदेखील काही कुटुंबाची किराणा किट जबाबदारी घेतली. फाउंडेशनच्या स्वंयसेवकांनी श्रमदान करत ‘किराणा किट’ तयार केल्या. यात महिनाभर पुरेल एवढे गहू, तांदूळ, साखर, दाळ आणि दैनंदिन गरजेचे साहित्य आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत श्रीरामपूरमध्ये गरजवंत कुटुंबांना घरी जाऊन किराणा किट देण्याचे काम करत आहे. या वेळी पाहुण्याच्या हस्ते किट देण्यात आली. छलारे, बबनराव तागड, आरोग्य मित्र सुभाष गायकवाड, सोशल सर्व्हिस फाउंडेशनचे उपाध्यक्ष गणेश कारंडे, श्री. इम्पेक्सचे सहकारी व फाउंडेशनचे अध्यक्ष सूरज सूर्यवंशी उपस्थित होते.

----------

२६ श्री इम्पेक्स फोटो

श्री फर्निचर मॉलकडून गरजू कुटुंबांना किराणा मालाचे वाटप करण्यात आले.

Web Title: Distribution of groceries to the needy from Mr. Impex Furniture Mall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.