पिंपरी अवघडमध्ये दिव्यांग बांधवांना किराणा साहित्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:15 IST2021-07-16T04:15:54+5:302021-07-16T04:15:54+5:30
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आधार वेल फाउंडेशनच्या अध्यक्ष वैशाली नान्नोर या होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे विनोदसिंग परदेशी, पप्पूशेठ येवले, ...

पिंपरी अवघडमध्ये दिव्यांग बांधवांना किराणा साहित्याचे वाटप
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आधार वेल फाउंडेशनच्या अध्यक्ष वैशाली नान्नोर या होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे विनोदसिंग परदेशी, पप्पूशेठ येवले, नितीन पानसरे, मालोजी शिकारे, प्रशांत पवार, माजी सरपंच सुरेश लांबे, सरपंच रेखा पटारे, उपसरपंच लहानू तमनर, शिवा लांबे, प्रियांका बर्डे आदींची उपस्थिती होती.
विनोदसिंग परदेशी म्हणाले, दिव्यांग बांधवांना आता घाबरण्याची किंवा डगमगण्याची काही गरज नाही. आता दिव्यांगांचे खरे वारसदार विधानसभेच्या मंत्रिमंडळात दाखल झालेले आहेत. दिव्यांगांचे सर्व प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडविण्यास त्यांचा प्रामाणिक प्रयत्न चालू असतो. कोरोनासारख्या भयंकर महामारीतदेखील दिव्यांग बांधव स्वाभिमानाने जगत आहेत.
याप्रसंगी बादशहा शेख, भाऊसाहेब लांबे, बाळकृष्ण कांबळे, जगन्नाथ गायकवाड, बाळासाहेब लांबे, अनिल दोंड, नामदेव पवार, गोपी लांबे, राहुल गायकवाड, संदीप लोखंडे, अक्षय तनपुरे, शांताबाई देवरे, शकुंतला गायकवाड आदींची उपस्थिती होती.