जोहारवाडी येथे ५० कुटुंबांना किराणा वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:22 IST2021-04-27T04:22:19+5:302021-04-27T04:22:19+5:30

करंजी : मोलमजुरी करून हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबाची होत असलेली उपासमार ध्यानात घेऊन जोहारवाडी (ता.पाथर्डी) येथील मच्छिंद्र सावंत मित्रमंडळाने ...

Distribution of groceries to 50 families at Joharwadi | जोहारवाडी येथे ५० कुटुंबांना किराणा वाटप

जोहारवाडी येथे ५० कुटुंबांना किराणा वाटप

करंजी : मोलमजुरी करून हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबाची होत असलेली उपासमार ध्यानात घेऊन जोहारवाडी (ता.पाथर्डी) येथील मच्छिंद्र सावंत मित्रमंडळाने ५० कुटुंबांना किराणा मालाचे वाटप करून समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण केला.करंजी परिसरातही कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. गावासह परिसरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाच्या भीतीमुळे कोणीही कामावर येऊ देत नाही. बाहेरगावी कामावर जाता येईना, अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतमजूर तसेच गोरगरीब कुटुंबाची उपासमार होत असल्याचे पाहून समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या मच्छिंद्र सावंत मित्रमंडळाने ५० कुटुंबांना किराणा मालाचे वाटप केले.

जोहारवाडी वि. का. सेवा सोसायटीचे अध्यक्ष लालासाहेब सावंत यांच्या हस्ते किराणा मालाचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी वि. का. सेवा सोसायटीचे अध्यक्ष व मंडळाचे अध्यक्ष मच्छिंद्र सावंत होते. यावेळी आण्णासाहेब वांढेकर, बाळासाहेब सावंत, महादेव वांढेकर, मुरलीधर वांढेकर, बंडू सावंत, प्रदीप कराळे, आदिनाथ सावंत, अक्षय सावंत, मित्र मंडळातील कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी फिजिकल डिस्टन्स, मास्क, आदींचे पालन करण्यात आले.

--

२६ जोहारवाडी

जोहारवाडी येथे गरजू ५० कुटुंबांना किराणा मालाचे वाटप करण्यात आले.

Web Title: Distribution of groceries to 50 families at Joharwadi