महिलांना मोफत शिलाई मशीनचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:15 IST2021-06-20T04:15:38+5:302021-06-20T04:15:38+5:30

संपूर्ण जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीमध्ये अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. अनेकांसाठी तर दोन वेळचे अन्न मिळविण्याचे सर्व मार्ग ...

Distribution of free sewing machines to women | महिलांना मोफत शिलाई मशीनचे वितरण

महिलांना मोफत शिलाई मशीनचे वितरण

संपूर्ण जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीमध्ये अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. अनेकांसाठी तर दोन वेळचे अन्न मिळविण्याचे सर्व मार्ग बंद झालेले दिसत आहेत. काहींनी घरातील कमवता कुटुंबप्रमुख गमावला आहे. कुणावरही येऊ नये अशी वेळ या कुटुंबातील महिला, मुला-मुलींवर आली आहे. महिला सशक्तीकरण करण्याच्या हेतूने अहमदनगर जिल्ह्यात हा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक शिलाई मशीन देण्यात येणार असून, हे मशीन वापरण्यासाठी सर्व महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सर्व मशीनचे व त्यासंदर्भातील प्रशिक्षण हे पूर्णतः मोफत असणार आहे. रोटरी क्लब संगमनेरतर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, आपल्या परिसरात किंवा ओळखीच्या महिला भगिनींना या प्रकल्पाबद्दल माहिती देऊन त्यांचा सहभाग निश्चित होईपर्यंत आपण त्यांना मदत करावी. या प्रकल्पामध्ये सहभागी होण्यासाठी गुरुवार (दि. २४) पर्यंत अर्ज करावेत.

Web Title: Distribution of free sewing machines to women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.