आरपीआयच्या वतीने गरजू कुटुंबीयांना अन्न-धान्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:19 IST2021-05-01T04:19:23+5:302021-05-01T04:19:23+5:30
टाळेबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या गरजू घटकांसाठी आरपीआयने पुढाकार घेऊन प्रत्येकी एका कुटुंबासाठी ५ किलो गहू व ५ किलो तांदूळ ...

आरपीआयच्या वतीने गरजू कुटुंबीयांना अन्न-धान्याचे वाटप
टाळेबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या गरजू घटकांसाठी आरपीआयने पुढाकार घेऊन प्रत्येकी एका कुटुंबासाठी ५ किलो गहू व ५ किलो तांदूळ देण्यात येत आहे. नुकतेच सावेडी येथे आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी अन्न-धान्य पाकीट बनवून कार्यकर्त्यांमार्फत वितरित केले आहे. प्रत्येक कार्यकर्ता आपल्या भागातील गरजू घटकांना ही मदत पोहोच करणार आहे.
शहराध्यक्ष सुशांत म्हस्के म्हणाले, कोरोनामुळे पुन्हा पुकारण्यात आलेल्या टाळेबंदीत रोजगार नसल्याने सर्वसामान्य कामगारांच्या कुटुंबीयांची उपासमार होत आहे. या संकट काळात कोणीही नागरिक उपाशी राहू नये, यासाठी आरपीआयच्या वतीने अन्न-धान्याचे वाटप सुरु करण्यात आले आहे. शहरातील विविध भागात राहणारे हातावर पोट असणारे व धुणी, भांडी करणाऱ्या महिलांच्या कुटुंबीयांना ही मदत दिली जात आहे. आरपीआयचे संकेत कळकुंबे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यासाठी शहराध्यक्ष सुशांत म्हस्के, युवकचे जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, तुषार गायकवाड, उमेश गायकवाड, आकाश भालेराव, हर्षद पेंढारकर, विकी प्रभळकर, सोनू भंडारी, मोनू गायकवाड, चिकू गायकवाड परिश्रम घेत आहे.
........................
३० आरपीआय
नगर शहरातील दोनशे गरजू कुटुंबीयांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने अन्न-धान्याचे वाटप करण्यात आले. अन्न-धान्याचे पाकिटे तयार करताना संकेत कळकुंबे, सुशांत म्हस्के, पवन भिंगारदिवे, तुषार गायकवाड, उमेश गायकवाड, आकाश भालेराव, हर्षद पेंढारकर, विकी प्रभळकर, सोनू भंडारी, मोनू गायकवाड, चिकू गायकवाड आदी.