नाभिक समाजाला जीवनाश्यक वस्तूंचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:34 IST2021-05-05T04:34:26+5:302021-05-05T04:34:26+5:30

टाकळी ढोकेश्वर : गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनासारख्या महामारीमुळे नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. याची जाणीव ठेवत सुजित ...

Distribution of essential commodities to the nuclear community | नाभिक समाजाला जीवनाश्यक वस्तूंचे वाटप

नाभिक समाजाला जीवनाश्यक वस्तूंचे वाटप

टाकळी ढोकेश्वर : गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनासारख्या महामारीमुळे नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. याची जाणीव ठेवत सुजित झावरे यांच्या माध्यमातून पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर, वडगाव सावताळ, कान्हूर पठार, वासुंदे गावातील नाभिक बांधवांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.

पारनेर तालुक्यातील सर्व नाभिक समाज बांधवांना लवकरच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे, असे सुजित झावरे यांनी सांगितले. नाभिक समाजासाठी राज्य शासनाने मदत करावी, असेही ते म्हणाले. यावेळी किसन धुमाळ, अमोल साळवे, मोहनराव रोकडे, अशोक पाटोळे, करण टोपले, संदीप खंडाळे, गोरख ताठे, गणेश खंडाळे, पोपटराव आतकर, बाळासाहेब खंडाळे, पंढरीनाथ आतकर, नारायण खंडाळे, विनायक कुठे, आत्माराम खंडाळे, राहुल खंडाळे, अमोल खंडाळे, मुरली आतकर, पांढुरंग जाधव, भरत खंडाळे, नीलेश आतकर, दीपक आतकर, नीलेश गायकवाड, बंडू राऊत, योगेश शिंदे, गणेश यादव आदी उपस्थित होते.

Web Title: Distribution of essential commodities to the nuclear community