जवान मित्र मंडळातर्फे गरजूंना ब्लँकेटचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:19 IST2020-12-29T04:19:23+5:302020-12-29T04:19:23+5:30

कार्यक्रमाच्या प्रारंभी सुख, शांती, समृद्धीसाठी व कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी प्रभू येशू चरणी प्रार्थना करण्यात आली. यावेळी आमदार संग्राम ...

Distribution of blankets to the needy by Jawan Mitra Mandal | जवान मित्र मंडळातर्फे गरजूंना ब्लँकेटचे वाटप

जवान मित्र मंडळातर्फे गरजूंना ब्लँकेटचे वाटप

कार्यक्रमाच्या प्रारंभी सुख, शांती, समृद्धीसाठी व कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी प्रभू येशू चरणी प्रार्थना करण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले, मानवसेवा हीच ईश्‍वरसेवा आहे. दीन-दुबळ्यांना मदत केल्याने जीवनात सुख-समृद्धी नांदत असते. गरजूंना आधार देण्यासाठी माजी नगरसेवक रुपसिंग कदम विविध सामाजिक उपक्रम राबवीत असतात. ख्रिसमसनिमित्त सलग ३४ वर्षे ब्लँकेट वाटपाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. वाढत्या थंडीची तीव्रता लक्षात घेऊन जवान मित्र मंडळाने घेतलेल्या उपक्रमातून गरजूंना ऊब मिळणार आहे.

-----------

फोटो- २७ ब्लँकेट वाटप

कोठी येथील जवान मित्र मंडळाच्यावतीने गरजूंना ब्लँकेटचे वाटप आमदार संग्राम जगताप यांनी केले. यावेळी द. स. पारगे, उबेद शेख, बाळासाहेब भुजबळ, माजी नगरसेविका शैला कदम, माजी नगरसेवक रुपसिंग कदम, नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय लोखंडे, आदी उपस्थित होते.

Web Title: Distribution of blankets to the needy by Jawan Mitra Mandal