वारीत महिलांना बायोगॅस शेगडीचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:21 IST2021-03-10T04:21:16+5:302021-03-10T04:21:16+5:30
कोपरगाव : तालुक्यातील वारी ग्रामपंचायतीच्या वतीने सोमवारी (दि. ८) ‘महिला दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी गावातील बायोगॅस प्रकल्पाच्या नऊ ...

वारीत महिलांना बायोगॅस शेगडीचे वाटप
कोपरगाव : तालुक्यातील वारी ग्रामपंचायतीच्या वतीने सोमवारी (दि. ८) ‘महिला दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी गावातील बायोगॅस प्रकल्पाच्या नऊ लाभार्थी महिलांना प्रोत्साहन म्हणून ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून गॅस शेगड्यांचे वाटप करण्यात आले.
आधार नसलेल्या ज्या महिलांनी काबाडकष्टातून प्रपंचाचा गाडा चालविला; आपल्या मुलामुलींना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करून त्यांचे लग्न लावून दिले, अशा १० महिलांचा गौरव करण्यात आला. तसेच गावातील आशासेविका, महिला बचत गटाच्या महिलांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच सतीश कानडे, उपसरपंच मनीषा गोर्डे, ग्रामपंचायतीचे सदस्य राहुल टेके, विजय गायकवाड, अनिल गोरे, ग्रामविकास अधिकारी प्रशांत बरबडे, महिला सदस्य सुवर्णा गजभिव, नंदा निळे, अनिता संत, विमल गायकवाड यांच्यासह सर्व महिला उपस्थित होत्या.
फोटो०९ - महिलांना बायोगॅस शेगडीचे वाटप - कोपरगाव