आव्हाड प्रतिष्ठानकडून अर्सेनिक अल्बमचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:26 IST2021-04-30T04:26:25+5:302021-04-30T04:26:25+5:30
पाथर्डी : येथील अभय आव्हाड प्रतिष्ठानमार्फत शहरातील मेहेर टेकडी, भुसारी गल्ली, दलित वस्ती या भागात अर्सेनिक अल्बम, व्हिटॅमीन सी ...

आव्हाड प्रतिष्ठानकडून अर्सेनिक अल्बमचे वाटप
पाथर्डी : येथील अभय आव्हाड प्रतिष्ठानमार्फत शहरातील मेहेर टेकडी, भुसारी गल्ली, दलित वस्ती या भागात अर्सेनिक अल्बम, व्हिटॅमीन सी आदींचे वाटप करण्यात आले. गर्दीमुळे कोरोना लसीकरण मोहिमेस अडथळा येऊ नये यासाठी दररोज या भागातील २५ ते ३० नागरिकांच्या लसीकरणाचे प्रतिष्ठानकडून नियोजन करण्यात येत आहे. कोणीही घराबाहेर न पडता कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करावी. पाथर्डीत उद्भवलेली भयानक परिस्थिती पाहता बाजारात अनावश्यक गर्दी न करता घरी राहून आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन अभय आव्हाड यांनी केले.
यावेळी नगरसेवक प्रसाद आव्हाड, प्रतिष्ठानचे खजिनदार दादासाहेब वाघ, मन्सूर शेख, सतीश डोळे, मनोज ढाकणे, इंद्रजित बोरले, अभिजित खेडकर, बापू खंडागळे आदींनी सहभाग घेतला.