‘श्रमशक्ती’मध्ये कृषी पदविका अभ्यासक्रम प्रमाणपत्रांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:24 IST2021-09-24T04:24:23+5:302021-09-24T04:24:23+5:30
संगमनेर : तालुक्यातील मालदाड येथील सेवा संस्कार संस्थेच्या श्रमशक्ती कृषी महाविद्यालयात बुधवारी (दि. २२) चाळीस कृषी निविष्ठा विक्रेत्यांना कृषी ...

‘श्रमशक्ती’मध्ये कृषी पदविका अभ्यासक्रम प्रमाणपत्रांचे वितरण
संगमनेर : तालुक्यातील मालदाड येथील सेवा संस्कार संस्थेच्या श्रमशक्ती कृषी महाविद्यालयात बुधवारी (दि. २२) चाळीस कृषी निविष्ठा विक्रेत्यांना कृषी विस्तार पदविका अभ्यासक्रम प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
मॅनेज (हैद्राबाद) आणि आत्मा (अहमदनगर) यांच्या संयुक्त विद्यमाने इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स को-ऑपरेटिव्ह सहकारी संस्थेच्या इफको-नॅनो युरिया उत्पादनाचा विक्री शुभारंभ कार्यक्रम पार पडला. जिल्हा कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक शिवाजी जगताप, इफकोचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश देसाई, श्रमिक उद्योग समूहाचे संस्थापक साहेबराव नवले कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. अशोक कडलग, प्राचार्य गणपत बाचकर, प्रा. डॉ. अरविंद हारदे, प्रा. डाॅ. नेहा काळे, सोसायटीचे अध्यक्ष लिंबा नवले, सचिव विष्णू लोंढे, विलास नवले, रावसाहेब नवले आदी यावेळी उपस्थित होते.