नगर शहरात वाहनांची तोडफोड
By Admin | Updated: October 13, 2016 00:57 IST2016-10-13T00:25:06+5:302016-10-13T00:57:44+5:30
अहमदनगर : शहरातील पाइपलाइन रोड परिसरातील साईश्रद्धा कॉलनीत पार्क केलेल्या चार कारसह एका हातगाडीची समाजकंटकांनी तोडफोड करत दहशत निर्माण

नगर शहरात वाहनांची तोडफोड
अहमदनगर : शहरातील पाइपलाइन रोड परिसरातील साईश्रद्धा कॉलनीत पार्क केलेल्या चार कारसह एका हातगाडीची समाजकंटकांनी तोडफोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला़ मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली़
याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात कारमालकांनी दिलेल्या फिर्यादिवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ मंगळवारी मध्यरात्री साईश्रद्धा कॉलनीत अभिजित धोंडिराम अनाप यांची वॅगनर, डॉ़ अनंत अशोक इंगळे यांची इंडिका, तेजस आकाश जिपलाटे यांची इंडिका, तर गोकुळ ताराचंद डाके यांची होंडासिटी कारच्या काचा फोडण्यात आल्या. सर्व कारच्या पाठीमागील व बाजूच्या काचा तोडण्यात आल्या आहेत. तसेच साईश्रद्धा कॉलनीत उभा असलेल्या हातगाडीची, रस्त्यावरील दुकानांसमोर लावण्यात आलेल्या पाट्यांची या वेळी तोडफोड करण्यात आली़ याप्रकरणी सर्व कारमालक व हातगाडीचे मालक कैलास कोंड्याल यांनी पोलीस ठाण्यात स्वतंत्र फिर्याद दाखल केली असून, पोलिस या घटनेतील आरोपींचा शोध घेत आहेत़ या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे़
ही वाहने कुणी व कोणत्या उद्देशाने फोडली, हे पोलिसांना समजू शकलेले नाही. घटनेनंतर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. मात्र, अद्याप आरोपीचा शोध लागलेला नाही.
(प्रतिनिधी)