राष्ट्रीय स्पर्धेत दिशान गांधीचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:20 IST2021-02-07T04:20:06+5:302021-02-07T04:20:06+5:30

यावेळी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, सचिव संजय जोशी, प्राचार्य आर. एन. शिंदे, डॉ. पारस कोठारी, कार्याध्यक्ष ...

Dishan Gandhi's success in the national competition | राष्ट्रीय स्पर्धेत दिशान गांधीचे यश

राष्ट्रीय स्पर्धेत दिशान गांधीचे यश

यावेळी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, सचिव संजय जोशी, प्राचार्य आर. एन. शिंदे, डॉ. पारस कोठारी, कार्याध्यक्ष अजय बोरा, क्रीडा संचालक अजय धोपावकर, कल्याण लकडे, किशोर गांधी, जगदीश झालानी, आदी उपस्थित होते. दिशान हा हिंद सेवा मंडळाचे सदस्य किशोर गांधी यांचा मुलगा आहे. दिशान याला कांस्यपदकासोबतच आंतरविद्यापीठ स्पर्धेत पाच हजार रुपयांची शिष्यवृत्तीही मिळाली आहे. याबद्दल दिशान याचा प्रा. मोडक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना प्रा. मोडक म्हणाले, अभ्यासाबरोबर खेळ मुलांचे भवितव्य घडवितात. खेळाडूंमुळे महाविद्यालयाची शान वाढते. सत्कारामुळे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. प्रा. धोपावकर यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन यामुळे यश मिळाल्याचे दिशान याने सांगितले.

---

फोटो- ०६ सारडा कॉलेज

राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक मिळविल्याबद्दल दिशान गांधी याचा हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे, क्रीडा प्रशिक्षक प्रा. संजय धोपावकर.

Web Title: Dishan Gandhi's success in the national competition