प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:30 IST2021-02-05T06:30:47+5:302021-02-05T06:30:47+5:30

संगमनेरात राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशन व नगर जिल्हा पतसंस्था स्थैर्यनिधी सहकारी संघाच्या वतीने नाशिक ...

Discussions with the Chief Minister to resolve the pending issues | प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा

प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा

संगमनेरात राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशन व नगर जिल्हा पतसंस्था स्थैर्यनिधी सहकारी संघाच्या वतीने नाशिक विभागातील पतसंस्थांच्या सहकार संवाद कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी सोमवारी (दि. १) ते बोलत होते. प्रथम सत्रात कार्यशाळेचे उद्घाटन विभागीय सहनिबंधक राजेंद्र शहा यांच्या हस्ते करण्यात आले. पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा, पतसंस्था स्थैर्यनिधी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे, पतसंस्था फेडरेशचे महासचिव शांतीलाल सिंगी, कर्याध्यक्ष राजुदास जाधव, उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव, खजिनदार दादाराव तुपकर आदींसह नगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील पतसंस्थांचे सुमारे ७०० प्रतिनिधी उपस्थित होते.

पतसंस्था फेडरेशनने मांडलेल्या सर्व मागण्या अत्यंत रास्त आहेत. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन करणे योग्य आहे. मात्र, राज्यातील पतसंस्थांना आंदोलन करण्याची वेळ येत कामा नये. सूत्रसंचालन पतसंस्था फेडरेशनच्या व्यवस्थापिका सुरेखा लवांडे यांनी केले, स्थैर्यनिधी संघाचे अध्यक्ष वाबळे यांनी आभार मानले. फेडरेशचे संचालक गोविंद अग्रवाल, अ‍ॅड. अंजली पाटील, नारायण वाजे, नगर जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष सबाजी गायकवाड, नंदुरबार फेडरेशनचे अध्यक्ष डॉ.कांतीलाल टाटीया, धुळे फेडरेशनचे अध्यक्ष अरुण महाले आदी उपस्थित होते.

संगमनेर तालुका फेडरेशनचे अध्यक्ष बापूसाहेब टाक व संग्राम पतसंस्थेचे अध्यक्ष राणीप्रसाद मुंदडा यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

.............

राज्य सरकारकडून आम्हाला सहकार्य मिळत नाही. बँकांच्या ठेवींना विमा संरक्षण आहे, मग पतसंस्थांच्या ठेवींना का नाही, पतसंस्थांवर नियामक मंडळ लादून अंशदान वसूल करण्याचा जाचक निर्णय सरकारने घेतला आहे. त्यास आमचा तीव्र विरोध आहे. पतसंस्थांच्या अनेक मागण्यांकडे वर्षानुवर्ष प्रत्त्येक सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता शांत न बसता सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही बेमुदत आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

- काका कोयटे, अध्यक्ष, पतसंस्था फेडरेशन, महाराष्ट्र राज्य

Web Title: Discussions with the Chief Minister to resolve the pending issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.