घोड, भीमाकाठावरील गावांच्या ग्रामसभेत होणार वाळू लिलावावर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:23 IST2021-08-15T04:23:42+5:302021-08-15T04:23:42+5:30

श्रीगोंदा : तालुक्यातील घोड, भीमा नदीकाठावरील गावांमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ग्रामसभेत ई-पीक पाहणी नोंद, वाळूसाठे लिलाव, दगड, खाण याबाबत ...

Discussion on sand auction will be held in the village meetings of the villages on horseback | घोड, भीमाकाठावरील गावांच्या ग्रामसभेत होणार वाळू लिलावावर चर्चा

घोड, भीमाकाठावरील गावांच्या ग्रामसभेत होणार वाळू लिलावावर चर्चा

श्रीगोंदा : तालुक्यातील घोड, भीमा नदीकाठावरील गावांमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ग्रामसभेत ई-पीक पाहणी नोंद, वाळूसाठे लिलाव, दगड, खाण याबाबत चर्चा होणार आहे. याबाबतचे आदेश प्रभारी तहसीलदार चारुशीला पवार यांनी काढले आहेत.

श्रीगोंदा तालुक्यात ११६ महसुली गावे आहेत. यामध्ये ८६ ग्रामपंचायती आहेत. कोरोनाचे सावट असताना ई पीक ॲपद्वारे नोंद करणे व वाळूसाठे लिलाव, दगड, खाण पट्टा हे विषय चर्चिले जाणार आहेत. वाळूसाठे लिलावाबाबत मागील दोन महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत सदस्य बैठकीत चर्चा झाली. १८ पैकी १५ ग्रामपंचायतींनी वाळूसाठ्याचा लिलाव करू नये, असे ठराव केले. तीन गावांनी वाळू लिलावाला हिरवा कंदील दाखविला होता.

पेडगाव, अजनूज, आर्वी, अनगरे, निमगाव खलू, कौठा, सांगवी, काष्टी, वांगदरी, डोमाळेवाडी, राजापूर, गार, वडगाव शिंदोडी, म्हसे, दाणेवाडी या १५ ग्रामपंचायतींमध्ये वाळूसाठे लिलावाबाबत फेरचर्चा होणार आहे. बोरी, गव्हाणेवाडी, हिंगणी या गावांनी यापूर्वीच वाळूसाठे लिलावास होकार दिला आहे.

Web Title: Discussion on sand auction will be held in the village meetings of the villages on horseback

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.