‘महावितरण’विरुध्द असंतोष
By Admin | Updated: August 27, 2014 23:09 IST2014-08-27T23:01:27+5:302014-08-27T23:09:15+5:30
पाथर्डी : ‘मनसे’च्यावतीने वीजप्रश्नी बुधवारी वीज वितरण कंपनीच्या पाथर्डी शहरातील कार्यालयात तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.

‘महावितरण’विरुध्द असंतोष
पाथर्डी : ‘मनसे’च्यावतीने वीजप्रश्नी बुधवारी वीज वितरण कंपनीच्या पाथर्डी शहरातील कार्यालयात तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी कंपनीच्या निषेधाच्या घोषणा देऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले.
‘मनसे’चे जिल्हाध्यक्ष, पंचायत समिती सदस्य देविदास खेडकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. ‘महावितरण आपल्या दारी’ योजनेतील शेतकऱ्यांच्या विहिरीवर खांब नाहीत तरी बिलाची आकारणी होते तरी ही बिल आकारणी रद्द करावी तसेच भालगाव गणातील सिंगल फेजची अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करावी, या प्रमुख मागण्यांसाठी खेडकर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १०० शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात सुमारे तीन तास ठिय्या दिला. कार्यालयात जबाबदार अधिकारी नसल्यामुळे आंदोलक संतप्त झाले. हजर अधिकाऱ्यांना खेडकर यांनी धारेवर धरले. आंदोलनकर्त्यानी वीज वितरण कंपनीच्या विरोधात प्रचंड घोषणा दिल्या.
वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता व्ही.पी.कानडे, उपकार्यकारी अभियंता एस.के.उगले यांनी कामे सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष अविनाश पालवे, दत्तू डोंगरे, विनायक डोंगरे,निवृत्ती आंबेकर, नितीन घुले, विश्वनाथ खेडकर शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
(तालुका प्रतिनिधी)