शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

दीनमित्रकार मुकुंदराव पाटील पत्रकारिता व साहित्य पुरस्कार जाहीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2022 17:46 IST

दीनमित्रकार मुकुंदराव पाटील पत्रकारिता व साहित्य पुरस्कार जाहीर झाले आहेत.  

कुकाणा (अहमदनगर) : नेवासा तालुक्यातील तरवडी येथील सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीचे वतीने देण्यात येणारे सन २०२१-२२ या वर्षीचे दीनमित्रकार मुकुंदराव पाटील राज्यस्तरीय पत्रकारीता  व साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष व माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी दिली. तरवडी (ता. नेवासा) येथील दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीच्यावतीने सत्यशोधक विचारांशी बांधिलकी असणाऱ्या पत्रकारास व साहित्यास  दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीच्या वतीने १९९५ पासून दरवर्षी पुरस्कार दिले जातात. 

गुरुवार दि.१ डिसेंबर रोजी स्मारक समितीच्या सभागृहात सन २०२१-२२ च्या पुरस्कारांची घोषणा स्मारक समितीचे अध्यक्ष, माजी आमदार पांडुरंग अभंग व सचिव उत्तमराव पाटील यांनी घोषित केले ते  पुढिल प्रमाणे.

दीनमित्रकार सत्यशोधक मुकुंदराव पाटील पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अभिजित कांबळे (संपादक, महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन, मुंबई)

साहित्य पुरस्कार २०२१-२२ -दयाराम पाडलोस्कर,गोवा ( बवाळ-कथा ), प्रा. शिवाजीराव बागल, सोलापूर (ज्ञानमंदिरातील नंदादीप-कादंबरी), 

डॉ. नारायणा भोसले, मुंबई (देशोधडी -आत्मचरित्र), श्रीमती. सारिका उबाळे, अमरावती (कथार्सिस-काव्य), भारत सातपुते, लातूर (आम्ही फुले बोलतोय-बालकाव्य), प्रा. वसंत गिरी, बुलढाणा (तरुणांचे आयडॉल सुभाषचंद्र बोस-चरित्र), डॉ. प्रतिभा सुरेश जाधव,नाशिक (अस्वस्थतेची डायरी-वैचारिक लेखन), डॉ. तुकाराम रोंगटे,पुणे (आदिवासींचेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर-समिक्षा), राकेश सांळुके,सातारा (दख्खण समृद्ध प्रवास-प्रवासवर्णन), योगेश प्रकाश बिडवाई,मुंबई (कांद्याची रडकथा शिवार ते बाजार-संशोधन), डॉ. शिवलिंग मेनकुदळे,पुणे (प्रबोधनाचा वसा आणि वारसा-व्यक्तिवेध).

वरील पुरस्कार रविवार दि.१८ डिसेंबर २०२२ रोजी तरवडी, ता. नेवासा येथे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजा दीक्षीत यांचे हस्ते प्रदान केले जाणार आहेत अशी माहीती दीनमित्रकार मुकुंदराव पाटील समितीचे अध्यक्ष माजी आ. पांडुरंग अभंग,उपाध्यक्ष कॉ.बाबा आरगडे, सचिव उत्तमराव पाटील यांनी दिली

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJournalistपत्रकार