दिंडी महिपती महाराजांची

By Admin | Updated: June 26, 2014 00:45 IST2014-06-25T23:50:46+5:302014-06-26T00:45:23+5:30

राहुरी : प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र ताहाराबाद येथील संत क वी महिपती महाराज पायी दिंडीचे मंगळवारी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झाले.

Dindi Mahaprabhu's visit | दिंडी महिपती महाराजांची

दिंडी महिपती महाराजांची

राहुरी : प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र ताहाराबाद येथील संत क वी महिपती महाराज पायी दिंडीचे मंगळवारी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झाले. बुधवारी दिंडी राहुरीत आली. तेथे मिरवणूक व दैनंदिन कार्यक्रम झाल्यानंतर एक मुक्काम होणार आहे.
महिपती महाराज दिंडीमध्ये नाना महाराज गागरे, राजू चव्हाण, कांता कदम, बाळासाहेब वाळुज, बाळासाहेब मुसमाडे, बापू गागरे आदी सहभागी झाले आहेत़ बुधवारी राहुरी शहरात सोपानराव म्हसे, नगराध्यक्षा गयाबाई ठोकळे, प्राजक्त तनपुरे, डॉ़ उषाताई तनपुरे, प्रभाकर पानसंबळ , रावसाहेब तनपुरे आदींनी दिंडीचे स्वागत
देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी ही दिंडी आषाढी एकादशीच्या आधी पंधरा दिवसांपूर्वी पंढरीकडे निघते.
बारागाव नांदूरनंतर बुधवारी ही दिंंडी राहुरी येथे पोहोचली. बुधवारी राहुरीत मुक्काम करून गुरूवारी सकाळी दिंडीचे प्रस्थान नगरकडे होणार आहे़

Web Title: Dindi Mahaprabhu's visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.