डिंभे धरण ओव्हरफ्लोच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:20 IST2021-09-13T04:20:27+5:302021-09-13T04:20:27+5:30

श्रीगोंदा : कुकडी धरण पाणलोट क्षेत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांत धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यात ...

Dimbe dam on the way to overflow | डिंभे धरण ओव्हरफ्लोच्या मार्गावर

डिंभे धरण ओव्हरफ्लोच्या मार्गावर

श्रीगोंदा : कुकडी धरण पाणलोट क्षेत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांत धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यात आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. डिंभे, पिंपळगाव जोगे धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे डिंभे धरण लवकरच ओव्हरफ्लो होईल, मात्र कुकडीच्या लाभक्षेत्रात पावसाची वक्रदृष्टी कायम आहे.

कुकडीत गेल्यावर्षी २१ हजार ५२५ एमसीएफटी (७३ टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता. यंदा २० हजार ६२७ एमसीएफटी (७० टक्के) इतका साठा झाला. त्यामुळे गेल्यावर्षीची पातळीची सीमारेषा ओलांडण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

---

प्रकल्पातील धरणांसह पाणीसाठा

येडगाव ९५२ एमसीएफटी (४८ टक्के), माणिकडोह ५ हजार २५९ एमसीएफटी (५२ टक्के), वडज १ हजार ५९ एमसीएफटी (९० टक्के), डिंभे ११ हजार ७९५ एमसीएफटी (९४ टक्के), पिंपळगाव जोगे १ हजार ५६१ एमसीएफटी (४० टक्के), घोड १ हजार ४२७ एमसीएफटी (२९ टक्के), विसापूर ८९ एमसीएफटी (१० टक्के), सीना १ हजार ३१५ एमसीएफटी (७१ टक्के), खैरी ४३९ एमसीएफटी (९१ टक्के).

---- कधी होणार डिंभे - माणिकडोह बोगदा

डिंभे धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. माणिकडोह धरण मात्र ५२ टक्केच भरले आहे. डिंभे - माणिकडोह बोगदा झाला तर कुकडीतील तीन ते चार टीएमसी पाण्याची तूट भरून निघण्यास मदत होईल. त्यामुळे हा बोगदा कधी होणार, असा प्रश्न नगर, सोलापूर जिल्ह्यांतील शेतकरी विचारू लागले आहेत.

Web Title: Dimbe dam on the way to overflow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.