शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कुकडीचं पाणी पुणे जिल्ह्यात खेचण्यासाठी दिलीप वळसे आक्रमक, आज मंत्रालयात बैठक; नगर जिल्ह्यातील नेते संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 11:00 IST

या बैठकीत होणाऱ्या निर्णयाचा अहवाल शासनास दोन दिवसात शासनाला पाठवावा असे नमुद करण्यात आले आहे.

बाळासाहेब काकडे 

श्रीगोंदा (जि. अहमदनगर):  कुकडी प्रकल्पातील पाणी आंबेगाव, शिरुर तालुक्यात जास्तीत जास्त खेचण्यासाठी आमदार दिलीप वळसे आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज दि. 11 रोजी मंत्रालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावली आहे. या बैठकीपासून इतर लोकप्रतिनिधी यांना दुर ठेवण्यात आले आहे.

या बैठकीत होणाऱ्या निर्णयाचा अहवाल शासनास दोन दिवसात शासनाला पाठवावा असे नमुद करण्यात आले आहे. या बैठकीत डिंबे माणिकडोह प्रकल्प बोगदा तळपृष्ठ निश्चित होईपर्यत चतुर्थ सुधारीत विकास आखाड्यात समावेश करु नये. डिंबे धरणाखालील कळमजाई व म्हाळसाकांत उपसा सिंचन योजनांचा कुकडी प्रकल्पात समावेश करावा, आंबेगाव, शिरुर तालुक्याचा जल नियोजनाचा वाटा कायम ठेवावा, डिंबे डावा कालवा दुरुस्तीसाठी 80 कोटीचा निधी तातडीने मंजुर करावा, आंबेगाव तालुक्यात नदीद्वारे बंधाऱ्यात कायम पाणी सोडावे या अशा मागण्यांवर या बैठकीत  चर्चा होणार आहे. 

अहमदनगर, सोलापूर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळत नाही. यासाठी अनेक वर्षापासून लढा चालू आहे. यावर शासन ठोस भुमिका घेत नाही. नगर- सोलापूर जिल्ह्य़ातील शेतकरी कुकडीच्या पाण्यासाठी आशावादी आहेत. अशा परिस्थितीत दिलीप वळसे यांनी आपल्या पोळीवर तुप ओढण्यासाठी आक्रमक भुमिका घेतली आहे. डिंबे- माणिकडोह बोगद्याचा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोडतील आशा निर्माण झाली असताना वळसेंनी खो देण्यास सुरुवात केली. यावर  कुकडी लाभक्षेत्रातील  जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड आणि करमाळा तालुक्याचे लोकप्रतिनिधी काय भुमिका घेतात याकडे लक्ष राहणार आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलWaterपाणी