जुना रस्ता उकरून नवीन रस्त्याचे बांधकाम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:15 IST2021-07-10T04:15:49+5:302021-07-10T04:15:49+5:30
शिवसेनेचे उपशहरप्रमुख डमाळे हे घोडेकर मळा परिसरातील कायमचे रहिवासी आहेत. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सध्या घोडेकर मळा परिसरात ...

जुना रस्ता उकरून नवीन रस्त्याचे बांधकाम करा
शिवसेनेचे उपशहरप्रमुख डमाळे हे घोडेकर मळा परिसरातील कायमचे रहिवासी आहेत. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सध्या घोडेकर मळा परिसरात विकासकामांतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्यांची निर्मिती केली जात आहे. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी या भागात असाच रस्ता करण्यात आला होता. त्यावेळी काही नागरिकांची घरे उंच असूनही रस्त्याच्या बरोबरीने आली होती. आताही संबंधित ठेकेदाराकडून तोच कित्ता गिरवला जात असून पूर्वी अस्तित्वात असलेल्या रस्त्यावरच नवीन रस्त्याची झालर चढविली जात आहे. यापूर्वीच्या रस्ता आणि गटारीच्या कामांमुळे या भागातील नागरिकांना सुविधा मिळण्याऐवजी असुविधा निर्माण होऊ लागल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत असून त्यापेक्षा रस्ताच करू नका, असेही डमाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. घोडेकर मळा परिसरातील कामाबाबत आपल्याकडून करण्यात येणाऱ्या सूचनांचा विचार करून योग्य ती उचित कार्यवाही नगर परिषदेमार्फत करण्यात येईल, असे पत्र उपशहरप्रमुख डमाळे यांना नगर परिषदेच्या बांधकाम विभागाने दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. अनेकांनी डमाळे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला.
-------------------
संगमनेर नगर परिषदेच्या बांधकाम विभागाने लेखी दिल्यानंतर उपोषण मागे घेतले. मात्र, जुना रस्ता उकरून नवीन रस्त्याचे बांधकाम करावे. असे न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसेल. हा सर्वसामान्य नागरिकांचा हिताचा मुद्दा असून नगर परिषदेने याचा विचार करावा.
-विकास डमाळे, उपशहर प्रमुख, शिवसेना, संगमनेर